Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?
राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जींपर्यंत जवळपास प्रत्येक नेत्याने एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा केली, पण हीच भूमिका सगळे नेते किती काळ पुढे लावून धरतात, हे पाहावं लागेल.
ADVERTISEMENT
Opposition Alliance 2024 : केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) समोर मोठं आव्हान उभं करण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचे काम सध्या सुरू आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे नितीश कुमार यांनी बोलावलेल्या बैठकीत 15 पक्षांमध्ये प्राथमिक सहमती झाली. दुसरी बैठक १२ जुलै रोजी हिमाचल प्रदेशातील शिमला येथे होणार आहे.
ADVERTISEMENT
विरोधी पक्ष एकत्र निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची चर्चा करत आहेत, पण अरविंद केजरीवालांपासून ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादवांपर्यंत प्रत्येकाचा आपापला अजेंडा आहे. काही मुद्द्यांवर आमच्यात मतभेद असले तरी आम्ही एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बैठकीनंतर सांगितले. राहुल गांधींपासून ते ममता बॅनर्जींपर्यंत जवळपास प्रत्येक नेत्याने एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा केली, पण हीच भूमिका सगळे नेते किती काळ पुढे लावून धरतात, हे पाहावं लागेल.
आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी अध्यादेशाच्या मुद्द्यावर काँग्रेसने पाठिंबा न दिल्यास शिमला बैठकीवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. ममता बॅनर्जी यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्याची तिथे जास्त ताकद आहे, त्याने तिथे लढावे. त्यामुळे साहजिकच सर्वांना एकत्र आणणे हे नितीशकुमार यांच्यासाठी कठीण काम असणार आहे. त्यांचे गुरू जॉर्ज फर्नांडिस यांच्याप्रमाणे किंगमेकरची भूमिका यशस्वीपणे पेलण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. आणि त्यामुळेच हे आव्हान त्यांना पेलणार का, असा प्रश्न यानिमित्ताने पुढे आला आहे.
हे वाचलं का?
जॉर्ज फर्नांडिस यांना पेलले होते मोट बांधण्याचे शिवधनुष्य
विविध विचारसरणीच्या राजकीय पक्षांमध्ये एकमत निर्माण करणे हे विरोधी ऐक्याच्या मार्गातील सर्वात मोठे आव्हान आहे. स्वत:च्या अजेंड्यावर चालणाऱ्या पक्षांना समान अजेंड्यावर एकत्र आणून काम करायला तयार करणे हे अवघड काम आहे. मात्र, जॉर्ज फर्नांडिस यांनी तसे करून दाखवून दिले होते. त्यावेळी एनडीएचा समान अजेंडा तयार करण्यात आला आणि भाजपने आघाडीसाठी आपले प्रमुख मुद्दे सोडले, राम मंदिरापासून ते जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्यापर्यंत.
हेही वाचा >> व्लादिमीर पुतिन यांना निष्ठावंत येवजेनी प्रिझोझिनीने का दिला दगा? समजून घ्या
1998 मध्ये 13 महिन्यांच्या NDA सरकार कोसळल्यानंतर मध्यावधी निवडणुका झाल्या आणि एनडीएतील पक्षांनी मोठी उडी घेत पुन्हा सत्तेत बस्तान मांडलं. एनडीए सरकारनेही तेव्हा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. याचा संदर्भ देत विरोधी पक्षनेतेही भाजपकडून शिकण्याचा सल्ला देत आहेत.
ADVERTISEMENT
कॉमन अजेंडा ते सीट शेअरिंग, हे आहेत पेच
विरोधी एकजुटीच्या मार्गात समान किमान कार्यक्रम म्हणजेच कॉमन अजेंडापेक्षा जास्त जागावाटपाचा पेच अडकणार आहे. ममता बॅनर्जींनी जिथे तुम्ही मजबूत तिथे लढा असा फॉर्म्युला सूचवला आहे. अखिलेश यादवही ममता बॅनर्जींच्या फॉर्म्युल्याला पाठिंबा देत आहेत. दुसरीकडे, नितीश कुमार यांनी भाजपविरुद्ध एक विरुद्ध एक जागेवर एक असा नारा दिला आहे. सध्या तरी असं स्पष्ट दिसतंय की, भाजप आणि एनडीएच्या विरोधात एका जागेवर विरोधकांचा एकच उमेदवार उभा करायचा, हे प्रत्येक पक्षाने मान्य केले आहे, पण प्रश्न असा आहे की त्याग कोण करणार? लढणारा तो पक्ष कोणता असेल यावर एकमत होणे वाटते तितके सोपे नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Amol Mitkari : “पंकजा मुंडे राष्ट्रवादीत येणार, हे बावनकुळेंना माहितीये”
नितीश कुमार यांच्या सभेला पोहोचलेल्या अनेक पक्षांची वेगवेगळ्या राज्यांमध्ये चांगली पकड आहे. पश्चिम बंगालमध्ये टीएमसीची सत्ता आहे, तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाची सत्ता आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक, बिहारमध्ये जेडीयू-आरजेडी, दिल्ली आणि पंजाबमध्ये आम आदमी पक्ष सत्तेत आहे. यूपी निवडणुकीत अखिलेश यादव यांच्या सपाने भाजपला तगडे आव्हान दिले आहे. प्रत्येक पक्षाला जास्तीत जास्त जागांवर लढायचे आहे. ममता बॅनर्जींच्या फॉर्म्युल्यानुसार जर जागावाटपावर सहमती झाली, तर काँग्रेस पक्षाला लढण्यासाठी केवळ 230 जागा मिळतील, ज्यावर देशातील सर्वात जुना पक्ष सहमत होईल असे सध्या तरी दिसत नाही.
नितीश कुमार पहिली झाले परीक्षा पास
वेगवेगळ्या राज्यांतील आणि पार्श्वभूमीतील 15 पक्षांना एका व्यासपीठावर आणून नितीशकुमार यांनी पहिली परीक्षा उत्तीर्ण केली. जेव्हा जॉर्ज फर्नांडिस यांनी एनडीएच्या विस्तारासाठी पुढाकार घेतला होता, तेव्हा कोणत्याही पक्षाला भाजपमध्ये सामील होणे सोयीचे नव्हते. राम मंदिरापासून जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्यापर्यंतच्या भाजपच्या अजेंड्यावर अनेक पक्ष एकत्र येण्यास कचरत होते. पण, जॉर्ज फर्नांडिस यांनी हे आव्हान स्वीकारले. 1998 मध्ये जेव्हा AIADMK ने पाठिंबा काढून घेतल्याने 13 महिन्यांचे सरकार पडले, तेव्हा जॉर्ज यांनी NDA ची पुन्हा बांधणी केली आणि 4 पक्षांवरून 24 पक्षांना समावून घेतले होते.
जॉर्ज फर्नांडिस भाजप आणि छोट्या पक्षांमध्ये होते सांधा
जॉर्ज फर्नांडिस यांनी छोट्या पक्षांना भाजपसोबत एकत्र आणण्यात, एनडीएची बांधणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली जेव्हा राजकीय पक्ष भाजपसोबत जाण्यास इच्छुक नव्हते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासह भाजपचे अटलबिहारी वाजपेयी, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल आणि शिवसेनेचे बाळ ठाकरे यांनी एनडीएची पायाभरणी केली. या तिन्ही नेत्यांपेक्षा एनडीएचा समाजवादी चेहरा जॉर्ज फर्नांडिस यांना राजकीय पक्षांमध्ये जास्त स्वीकारार्हता होती. जॉर्ज फर्नांडिस यांना एनडीएच्या संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली होती.
हेही वाचा >> Pune, MPSC: आधी दर्शना पवारला क्रूरपणे मारलं, आता राहुल हांडोरे म्हणतो; मला…
आज काँग्रेसची अवस्था जवळपास तशीच आहे. विविध राज्यांतील बलाढ्य पक्ष काँग्रेस पक्षासोबत जाण्यास कचरत आहेत. वेगवेगळ्या पक्षांचा स्वतःचा अजेंडा, स्वतःचे राजकारण आहे. अशा परिस्थितीत छोट्या पक्षांना काँग्रेसशी जोडण्याची आणि विरोधी आघाडीची कुळ वाढवण्याची जबाबदारी नितीशकुमारांनी घेतली आहे. नितीश यांच्या पुढाकाराने 15 पक्षांच्या बैठकीत एकत्र निवडणूक लढवण्याबाबत करार झाला आहे, मात्र निवडणुकीच्या मैदानात उतरेपर्यंत हा करार कायम राहणार का? नितीश कुमार त्यांचे राजकीय गुरु जॉर्ज फर्नांडिस यांच्या करिष्म्याची पुनरावृत्ती शकतील का? हे बघणं फार औत्सुक्याचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT