Lok Sabha : लोकसभा निवडणूक चुरशीची होणार? मतदानाचा आकडा बदलणार महाराष्ट्राचे चित्र
Lok Sabha Election 2024 : आगामी 2024 लोकसभा निवडणूक ही चुरशीची होणार आहे. कारण 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणूक पाहिली असता 2019 मध्ये चुरशीच्या लढती वाढल्या होत्या.
ADVERTISEMENT

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. जागावाटप आणि उमेदवारांची निवड अंतिम टप्प्यात आली आहे. असे असताना आगामी 2024 लोकसभा निवडणूक ही चुरशीची होणार आहे. कारण 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणूक पाहिली असता 2019 मध्ये चुरशीच्या लढती वाढल्या होत्या. त्यामुळे सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि पक्षातील फाटाफुट पाहता महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचा अंदाज आहे. (lok sabha election maharashtra 2024 maha vikas aghadi vs mahayuti 2019 2014 election vote share)
लोकसभेचा काय लागला होता निकाल?
2014 ची पुनरावृत्ती करत 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना युतीने महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 41 जागा जिंकल्या होत्या. यामध्ये भाजपने 23 तर शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे विरोधकांच्या पारड्यात फक्त 7 जागा आल्या होत्या. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवणडणुकीचा निकाल एकतर्फी लागला होता.
2014 मध्ये काँग्रेसने 2 जागा जिंकल्या होत्या. मात्र 2019 मध्ये त्यांचा एका जागेवर पराभव झाला होता. त्यामुळे एकाच जागेवर त्यांना समाधान मानावे लागले होते. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी 2014 पासून 4 जागा राखण्यात यश आले होते. AIMIM ने औरंगाबादच्या जागेसाठी VBA सोबत युती केली होती आणि अमरावतीमधून एक अपक्ष उमेदवार उतरवला होता, अशाप्रकारे या आघाडीने दोन जागा जिकंल्या होत्या.
2019 च्या मतदानाची टक्केवारी
2019 च्या निवडणुकीतील मतांची टक्केवारी पाहिली असता, महाराष्ट्रातील 48 पैकी 21 मतदारसंघांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान होते. भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी 8 म्हणजेच 16 मतदारसंघ या वर्गवारीत येतात. तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडे तीन मतदार संघ आणि दोन मतदार संघ इतर पक्षाचे आहेत.
महाराष्ट्रातील 48 पैकी 27 मतदारसंघांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होते. भाजप आणि शिवसेनेचे 25 मतदारसंघ येतात. तर आघाडी आणि एमआयएमकडे 1 मतदार संघ येतो.










