'मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलोय', CM शिंदेंचे भावूक उद‍्गार

ADVERTISEMENT

Eknath shinde shrikant shinde
Eknath shinde shrikant shinde
social share
google news

Eknath Shinde: गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे महाअधिवेशन (Shiv sena Mahaadhiveshan) सुरु आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजकीय प्रवास सांगताना अनेक त्यांनी भावूक क्षण सांगितले. शुक्रवारी श्रीकांत शिंदे यांनी काही भावनिक क्षण सांगितले तर आज त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देत, श्रीकांत यांच्या भाषणाबद्दल बोलतान ते म्हणाले की मी बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलोय असल्याचं सांगत तेही भावनिक झाल्याचे दिसून आले.

एक चांगली आठवण

खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या बापाबद्दल म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना सांगितले की,'मी वेगवेगळ्या कार्यक्रमामधून जातो. कौटुंबीक कार्यक्रम असतात. मुलाखती असतात. दिवाळी असली राजकीय नेत्यांच्या मुलाखती होतात.त्यामध्ये मला पहिलाच प्रश्न असतो की, शिंदे साहेबांबद्दलची अशी एक चांगली आठवण सांगा. पण मी आज तुम्हाला सांगतो शिंदे साहेबांना मी जे पाहिलं हे फक्त शिवसैनिकांमध्ये पाहिलं. मला एकही लहानपणाची आठवण आठवत नाही. माझ्याबरोबर एकही क्षण त्यांनी व्यथित केले आहेत' ही आठवण त्यांनी सांगितल्यानंतर आज त्यावर बोलताना एकनाथ शिंदे आज प्रचंड भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

हे ही वाचा >> दंगलमधील छोट्या बबिताच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा

बाप आणि नवरा म्हणून अपयशी

खासदार आणि आपल्या सुपुत्राबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, 'काल श्रीकांत शिंदे यांनी बोलताना माझे त्यांनी बोलताना डोळे उघडले. कारण या सर्व गोष्टीमुळे मी,बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो' अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कुटुंबासाठी दिला नाही

एकनाथ शिंदे यांनी यावेळी हे ही सांगितले की, 'आपण फार कमी वेळ कुटुंबासाठी दिला आहे. मात्र काल ज्या प्रमाणे श्रीकांत शिंदे बोलले त्यानंतर मात्र माझे डोळे उघडल्याचे त्यांनी मान्य करत आपण बाप आणि नवरा म्हणून अपयशी ठरलो असल्याचे भावूक उद्गगारही त्यांनी काढले.

ठाकरेंवरही जोरदार प्रहार 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी ठाकरे गटावर आणि उद्धव ठाकरेंवरही जोरदार प्रहार केला. युतीबाबत आणि महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर झालेल्या राजकारणावरून व उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर शिवसेना आणि हिंदुत्वाच्या मुद्यावरूनही त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Eknath Shinde: 'उद्धव ठाकरेंना सत्तेचा मोह आतापासून नव्हता तर...'

    follow whatsapp

    ADVERTISEMENT