महाराष्ट्रातील शाळा अदानींच्या ताब्यात, शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर विरोधक पेटले

मुंबई तक

Gujarat Adani Foundation : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरात असलेले माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट या शाळेचे व्यवस्थापण शिक्षण विभागाने गुजरातमधील अदानी फाऊंडेशनकडे सोपवले आहे. ही शाळा विनाअनुदानीत असून येथे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. सरकारने या संदर्भात अदानी समूहाला काही अटी आणि शर्थी देखील घातल्या आहेत.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील 'ही' शाळा गुजरातमधील अदानी फाऊंडेशनकडे
maharashtra school chandrapur school transfer to the gujrat adani group foundation opposition leader criticize mahayuti government
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रातील 'ही' शाळा गुजरातमधील अदानी फाऊंडेशनकडे

point

शालेय शिक्षण विभागाने घेतला निर्णय

point

सरकारचा जीआरही आला

Gujarat Adani Foundation : विकास राजूरकर, चंद्रपूर : देशातील विविध पायाभूत सूविधा आणि अन्य व्यवसायांमध्ये आपले अस्तित्व दाखवणाऱ्या अदानी समुहाकडे आता शाळा देखील सोपवण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. गुजरातच्या अदानी फाऊंडेशनकडे राज्यातील 9 शाळांचे व्यवस्थापण हस्तांतरीत करण्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने काढला आहे. यात महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील खाजगी शाळेचा समावेश आहे.  राज्य सरकारच्या या निर्णयानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून शाळेच्या भिंतीवर अदांनीचा फोटो लावायची तयारी सरकारने सुरू केल्याची टीका होतेय.  

महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस शहरात असलेले माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट या शाळेचे व्यवस्थापण शिक्षण विभागाने गुजरातमधील अदानी फाऊंडेशनकडे सोपवले आहे. ही शाळा विनाअनुदानीत असून येथे पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण उपलब्ध आहे. सरकारने या संदर्भात अदानी समूहाला काही अटी आणि शर्थी देखील घातल्या आहेत. 

हे ही वाचा : Video : भाषण करताना काँग्रेस अध्यक्षाची तब्येत बिघडली, मंचावर कोसळले..., स्टेजवर काय घडलं?

घुग्घुस हे चंद्रपूर शहराजवळ एक औद्योगिक शहर आहे. शहरात कोळसा खाणी आणि सिमेंट उद्योग आहेत. एसीसी या प्रसिद्ध सिमेंट उत्पादक कंपनीचा कारखाना येथे आहे. काही वर्षांपूर्वी अदानी समूहाने एसीसीची मालकी घेतली होती. याच उद्योगात कामगार वर्गातील मुलांसाठी एक शाळा आहे जी पूर्वी माऊंट कार्मेल या मिशनरी संस्थेद्वारे चालवली जात होती. उद्योगाची मालकी एसीसीकडून अदानी समूहाकडे हस्तांतरित झाल्यानंतर अदानी समूहाने या शाळेचे नाव अदानी फाऊंडेशन स्कूल असे ठेवण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागामार्फत राज्य सरकारकडे पाठवला होता.त्यानुसार उद्योगाची ही 'इन-हाउस' चालवली जाणारी शाळा अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरित करण्यात आली, ही शाळा शासनाची किंवा जिल्हा परिषदेची नाही. ही खाजगी शाळा आहे, येथे पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले जाते.

जीआरमध्ये काय? 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने जारी केलेल्या जीआरनुसार, शाळेचे कामकाज अदानी फाऊंडेशन अहमदाबादकडे सोपविण्यात आले आहे, या संदर्भात, 30 जुलै रोजी शिक्षण उपसंचालक, नागपूर यांना पत्र पाठवले होते. अदानी समूहाच्या वतीने, या पत्राच्या आधारे, परंतु 27 सप्टेंबर 2024 रोजी जीआर जारी करण्यात आला आहे आणि काही अटी व शर्तीनुसार शाळेचे कामकाज अदानी समूहाकडे सोपवण्यात आले आहे. ही शाळा गेल्या 50 वर्षांपूर्वी स्थापन झाली असून ती ACC सिमेंट कंपनीच्या देखरेखीखाली चालवली जात होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp