Manipur Violence : मुख्यमंत्र्यांचं वडिलोपार्जित घर जाळण्याचा प्रयत्न
Cm biren singh house manipur violence : मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या घरावर संतप्त जमावाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षा जवान आणि जमावामध्ये झडप झाली. जमावाने मुख्यमंत्र्यांचे घर पेटवण्याचा प्रयत्न केला.
ADVERTISEMENT

Manipur violence Biren Singh House : मणिपूरमधील परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर झाली आहे. मेईती समाजातील दोन बेपत्ता विद्यार्थ्यांच्या हत्येनंतर राज्यात पुन्हा एकदा हिंसाचार उसळला आहे. गुरुवारी (28 सप्टेंबर) संतप्त आंदोलक आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये अनेक ठिकाणी चकमक झाली. दरम्यान, संतप्त जमावाने इंफाळमधील मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ला केला आणि ते जाळण्याचा प्रयत्न केला. (an angry mob tried to attack the ancestral residence of Chief Minister Biren Singh in Imphal.)
28 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घराकडे मोर्चा काढण्यासाठी इंफाळ पूर्वेतील हँगिंग भागात मोठ्या संख्येने आंदोलक जमले. मात्र सुरक्षा दलांनी त्यांना रोखले.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इंफाळमधील हँगिंग येथील मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र सुरक्षा दलांनी आंदोलकांना निवासस्थानापासून सुमारे 100 मीटर अंतरावर रोखले.
भाजपचे कार्यालय जाळले
या घटनेच्या एक दिवस आधी थौबल जिल्ह्यातही हिंसक निदर्शने झाली होती. त्यादरम्यान आंदोलक गटाने भाजप कार्यालयाला लक्ष्य केले. आंदोलकांनी गेट तोडले. यानंतर त्यांनी खिडक्यांच्या काचा फोडून पेटवून दिले. मात्र, काही वेळातच सुरक्षा दलांनी जमावाला पांगवले.