‘मराठ्यांचं आणि ओबीसींच हा एकटाच खातो’, जरांगे पाटलांची भुजबळांवर टीका

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

manoj jarange patil criticize chhagan bhujbal on maratha reservation chatrapati sambhaji nagar
manoj jarange patil criticize chhagan bhujbal on maratha reservation chatrapati sambhaji nagar
social share
google news

Manoj jarange patil criticize Chhagan bhujbal : मराठ्यांना ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या भूमिकेला मंत्री छगन भुजभळांनी (Chhagan bhujbal) विरोध केल्यापासून राज्यात जरांगे विरूद्ध भुजबळ असं युद्ध रंगलयं. या युद्धामुळे मराठा विरूद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलाय. असे असतानाच आता मनोज जरांगे पाटलांनी (Manoj jarange patil)  पुन्हा छगन भुजबळांवर हल्ला चढवला आहे. मराठ्यांचं आणि ओबीसींच हा एकटाच खातो, अशी टीका जरांगे पाटलांनी भुजबळांवर केली आहे. (manoj jarange patil criticize chhagan bhujbal on maratha reservation chatrapati sambhaji nagar)

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. ओबीसी समाजातल्या छोट्या छोट्या जातींना आरक्षणाचा लाभ हा एकटा मिळवून देत नाही. मराठ्यांच पण हाच खातो आणि ओबीसींमध्ये असलेल्या छोट्या-छोट्या जातींच देखील हाच खातो, अशी टीका जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर केली. सगळं तुच खातो एकटा मग म्हणतो माझ्या मागे लागले, असे देखील जरांगे पाटील म्हणाले.

हे ही वाचा :Kalyan crime : पत्नी आणि मुलाच्या हत्येचं कारण आलं समोर, घटनाक्रम ऐकून पोलिसही चक्रावले!

मराठ्यांना आता आरक्षण घेण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. कायद्याच्या चौकटीत मराठ्यांचे आरक्षण आहे. फक्त तुम्ही या लढाईत राजकारण आणू नका. राजकिय मतभेद आणि सामाजिक मतभेद होऊ देऊ नका. 80 टक्के ही लढाई आपण जिंकलीच आहे. आता आपल्याला ही लढाई जिंकायचीच आहे, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

हे वाचलं का?

हे ही वाचा :Babanrao Lonikar : राजेश टोपेंची गाडी का फोडली? भाजप नेते लोणीकरांनी सांगितलं कारण

32 लाख मराठ्यांना आतापर्यंत आरक्षण मिळाले आहे. 32 लाख मराठ्यांच्या घरात आयुष्याची भाकरी गेली. आता त्या नोंदीचा कायदा पारीत होऊन महाराष्ट्रातल्या मराठ्यांना 24 डिसेंबरपर्यंत सरसकट आरक्षण मिळणार आहे. जर सरकारने नाही दिलं तर आपण लढायला सज्ज आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT