Manoj Jarange : फडणवीसांना जरांगेचं खुल्लं चॅलेंज; म्हणाले, 'माझ्याविरुद्ध महिलेची एक जरी...'

ADVERTISEMENT

devendra fadnavis manoj jarange patil
devendra fadnavis manoj jarange patil
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'महिलेची एक जरी तक्रार सापडली तर...'

point

'फडणवीसांमुळे कुणबी प्रमाणपत्र मिळालं नाही'

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेलं असतानाच आज  मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. जरांगे पाटील यांच्यावर बारसकरांनी अनेक गंभीर आरोप केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे कुणबी प्रमाणपत्रं देणं बंद केल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.

ADVERTISEMENT

मराठ आरक्षणाच्या मुद्यावरून पेटलेल्या आंदोलनावरुन बोलतान मला संपवण्यासाठी बारसकरांचा वापर करून माझ्यावर आरोप केले जात आहेत. या सगळ्या पाठीमागे फडणवीसांचाच हात आहे. 

त्यामुळे माझा जर तुम्हाला बळी हवा असेल तर मीच आता तुमच्या सागर बंगल्यावर येतो असं म्हणत  जरांगे पाटील यांनी सागर बंगल्याकडे जाण्यासाठी निघाले आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >>'BJP चं धोरण मैत्री करून पाठीत खंजीर खुपसा आणि...' वडेट्टीवारांचा भाजपवर घणाघात

मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष कसा फोडला यावरूनही त्यांनी फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं आहे. देवेंद्र फडणवी यांच्यामुळेच एकनाथ खडसे, विनोद तावडे यांच्यापासून ते अगदी अजित पवारांनी राष्ट्रवादी सोडण्यालाही देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. 

त्याचबरोबर माझ्यावर आरोप करण्यासाठीच वेगवेगळी षडयंत्रही आखली जात आहेत मात्र देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर एक तरी दाखल झालेली केस दाखवावी नंतर मी त्यांचे सगळं ऐकेन असा जोरदार हल्लाबोल त्यांनी त्यांच्यावर केला आहे.  

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, 'माझ्याविरुद्ध महिलेची एक जरी तक्रार सापडली तर तुम्ही म्हणाल ते मी ऐकतो. गेल्या 30 वर्षात माझ्याविरुद्ध कुठेही कोणत्याही महिलेची तक्रार असेल तरी मी तुम्ही सांगाल ते ऐकतो असं थेटपणे त्यांनी फडणवीसांना म्हटले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ''वंचित'महाविकास आघाडीचाच एक घटक', राऊतांनी स्पष्टच सांगितलं...

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT