Maratha Reservationआंदोलनात फूट?, जरांगे-पाटलांविरोधात कोणी घेतली भूमिका?

मुंबई तक

ADVERTISEMENT

maratha morcha movement manoj jarange patil maratha reservation split in the who took a stand against
maratha morcha movement manoj jarange patil maratha reservation split in the who took a stand against
social share
google news

Maratha Reservation and Manoj Jarange-Patil: अभिजीत करंडे, मुंबई: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) चेहरा बनलेले मनोज जरांगे (Manoj Jarange-Patil) हे आता राज्यातील अनेक जिल्ह्यात जाऊन मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडत आहेत. दुसरीकडे सरकारवर देखील या माध्यमातून ते दबाव आणू पाहत आहेत. मात्र, दुसरीकडे आता मराठा आरक्षणाच्या आंदोलकर्त्यांमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एकीकडे मनोज जरांगे हे वेगळी भूमिका मांडत आहेत तर दुसरीकडे अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील हे वेगळीच भूमिका मांडत आहेत. (maratha reservation split in the maratha morcha movement who took a stand against manoj jarange patil)

ADVERTISEMENT

मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी त्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. मात्र, त्यांच्या याच मागणीला मराठा समाजातील दुसरे नेते नानासाहेब जावळे-पाटील यांनी छेद दिला आहे. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र दिलं तरी ते आरक्षण कोर्टात टिकणार नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी वेगळी तरतूद केली पाहिजे असं विधान जावळे-पाटलांनी केली आहे. त्यामुळे आता आरक्षणावरूनच मराठा समाजात दोन गट पडत असल्याचं दिसून येत आहे.

नानासाहेब जावळे-पाटलांची नेमकी मराठा आरक्षणावरुन भूमिका काय?

अखिल भारतीय छावा संघटनेची राज्यस्तरीय बैठक मुंबई येथे काल (5 ऑक्टोबर) पार पडली. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही. असे राज्य सरकार स्पष्ट करीत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Maratha Reservation : असा आहे मराठा आरक्षणाचा इतिहास?

कुणबी प्रमाणपत्र मराठ्यांच्या दबावाखाली जरी दिले गेले तरी ते कोर्टात टिकेल असे वाटत नाही. आता मराठ्यांना टिकणारे आरक्षण हवे आहे. यासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवून वेगळी तरतूद करून मराठ्यांना आरक्षण देता येईल. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. राज्य सरकारनेही ताबडतोब केंद्राकडे तशी मागणी करावी.

येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर मराठा संपर्क दौरा करून जर का राज्य सरकारने टिकाऊ आरक्षण दिले नाही तर मराठ्यांचा महासागर दिल्लीचे तख्त हलवून मोदी सरकारला जाब विचारणार असं नानासाहेब जावळे-पाटील यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘…तर लावा सलाईन, लावा गोळ्या, महिन्याभर चालून द्या’, CM शिंदेंसोबत फोनवरील चर्चेनंतर जरांगे पाटील म्हणाले

लाख मराठा एक दिशा असे आंदोलन असावे आंदोलनकर्त्यांनी वारंवार भूमिका बदलून नये. त्यामुळे मराठा समाज विखुरला व विभागाला जाईल असेही त्यांनी सांगितले. मुंबई येथे आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये हजारो पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. व्यासपीठावर यावेळी केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव भाऊ मराठे, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, मराठवाडा अध्यक्ष देवकर्ण वाघ, मराठवाडा संघटक डॉ.गोविंद मुळे, मराठवाडा कार्याध्यक्ष विलास बापू कोल्हे, केंद्रीय सल्लागार प्राध्यापक सत्यशील सावंत आदीसह अनेकांची व्यासपीठावर उपस्थिती होती

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT