पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल, श्याम रंगीला अडकणार कायद्याच्या कचाट्यात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

pm narendra modi comedian shyam rangeela got notice
pm narendra modi comedian shyam rangeela got notice
social share
google news

Shyam Rangeela PM Narendra modi Mimicry : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करून प्रसिद्धी झोतात आलेला मिमिक्री आर्टीस्ट आणि कॉमेडियन श्याम रंगीला (Shyam Rangeela) अडचणीत सापडला आहे. वाईल्ड़ लाईफ प्रोटेक्शन अॅक्टचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. जयपूरच्या झालाना जंगलात जाऊन त्याने नीलगायला खायला घातले होते. या संदर्भातला व्हिडिओ देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. या प्रकरणी आता राजस्थान वन विभागाने त्याला नोटीस जारी केली आहे.त्यामुळे श्य़ाम रंगीलाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (mimicking pm narendra modi comedian shyam rangeela got notice from rajasthan forest department)

ADVERTISEMENT

श्याम रंगीलाने (Shyam Rangeela) 13 एप्रिलला युट्यूब चॅनेलवर झालाना लेपर्ड रिजर्वचा व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओत श्याम गाडीतून खाली उतरत आपल्या हाथाने नीलगायला खायला घालताना दिसला होता. खरं तर वन्य प्राण्यांना अन्न देणे हे वन कायदा 1953 आणि वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या तरतुदींते उल्लंघन असल्याचे जयपुर क्षेत्रीय वन अधिकारी जनेश्वरी चौधरी यांनी सांगितले. तसेच वन्य जीवांना खाद्यपदार्थ खायला घातल्याने गंभीर आजार होतात, आणि त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे वन्य जीवांना खाद्य पदार्थ खाऊ न घालावे या संबंधीत सूचना बोर्डही लावण्यात आली होते. तरीही श्याम रंगीलाने नील गायीला खाद्य पदार्थ खाऊ घातले होते,अशी माहिती चौधरी यांनी दिली.

हे ही वाचा : ‘पुलवामा हल्ल्याचं नागपूर कनेक्शन’,सत्यपाल मलिकांनंतर नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

पंतप्रधांनांचा गेटअप कॉपी

श्याम रंगीला (Shyam Rangeela) पतंप्रधान नरेंद्र मोदी यांची हुबेहुब नक्कल करण्यावरून देखील निशाण्यावर सापडला आहे. नुकतंच टायगर प्रोजेक्टला 50 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान मोदी कर्नाटकच्या मदुमलाई आणि बांदीपूरच्या टायगर रिझर्वच्या दोऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी युनीक गेटअपमध्ये जंगल सफारीचा आनंद लुटला होता. त्याचप्रमाणे श्याम रंगीला देखील जयपुरच्या झालाना जंगलात पोहोचले होते. जसा पंतप्रधानांच्या जंगल सफारीचा फोटो व्हायरल झाला, ज्यामध्ये त्यांनी टोपी, चश्मा घातला होता.त्याप्रमाणेच गेटअप करत श्याम रंगीलाने शुट केले होते. या जंगल सफारीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होतायत. यामधील काही व्हिडिओ आणि फोटो हे नीलगायला खाद्यपदार्थ खायला घालणारे देखील आहेत, त्यामुळे तो वादात सापडलाय.

हे वाचलं का?

हे ही वाचा : महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतर ‘शोककळा’ : मृत्यू झालेले 11 श्री सदस्य कोण?

श्याम रंगीलाने (Shyam Rangeela) हे कृत्य करून वन्यजीव गुन्हाच केला नाही, तर व्हिडिओ अपलोड करून इतर नागरीकांना देखील गुन्हेगारी कृत्य करण्यास प्रवृत्त केले आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT