Mizoram Election Results 2023: राजस्थान नंतर मिझोरममध्ये सत्तांतर! ZPMला बहुमत तर सत्ताधारी MNFचा पराभव

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मिझोरमचे आरोग्य मंत्री लालथांगलियाना यांचा निवडणुकीत पराभव

मिझोरमचे आरोग्य मंत्री आणि MNF चे उमेदवार आर लालथांगलियाना दक्षिण तुइपुई विधानसभा जागा झेडपीएमच्या जेजे लालपेखलुआ यांच्याकडून 135 मतांच्या फरकाने पराभूत झाले.

ADVERTISEMENT

ZPM ची 26 जागांची लीड

मिझोरममध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेली ZPM सरकार स्थापन करताना दिसत आहे. ZPM 26 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटला 10 जागाच मिळाल्या आहेत. तर भाजप 3 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला केवळ 1 जागा मिळताना दिसत आहे.

मिझोरममध्ये लालदुहोमाच्या ZPM ला बहुमत

Mizoram Assembly Election Result Live Updates : मिझोरममध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेली झोरम पीपल्स मूव्हमेंट 26 जागांवर आघाडीवर आहे आणि मिझो नॅशनल फ्रंटला राज्यातील सत्तेतून बाहेर करताना दिसत आहे. भारतीय जनता पक्ष 3 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर आहे.

हे वाचलं का?

ZPM पहिल्या तर MNF दुसऱ्या स्थानी

Mizoram Assembly Election Result Live Updates : मिझोराममध्ये आतापर्यंत 40 पैकी 30 जागांचे ट्रेंड समोर आले आहेत. यामध्ये झोरम पीपल्स मूव्हमेंट 17 जागांवर तर मिझो नॅशनल फ्रंट 8 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने 5 जागांवर आघाडी घेतली आहे, तर भाजपचे खाते अद्याप उघडलेले नाही.

भाजपचे खातेच उघडले नाही

Mizoram Assembly Election Result Live Updates : मिझोरममधील 40 पैकी 20 जागांचे कल समोर आले आहेत. मिझो नॅशनल फ्रंट 9 जागांवर, झेडपीएम 7 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसलाही 4 जागांवर आघाडी मिळाली आहे. भाजपचे खाते अद्याप उघडलेले नाही.

ADVERTISEMENT

पोस्टल बॅलेट मतांमध्ये MNF आघाडीवर

Mizoram Assembly Election Result Live Updates : पहिल्या पोस्टल बॅलेटच्या मतांची मोजणी सुरू आहे. आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार मिझो नॅशनल फ्रंट 7 जागांवर तर झोरम पीपल्स मुव्हमेंट 5 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस 2 जागांवर पुढे आहे. भाजपचे खाते अजून उघडायचे आहे.

ADVERTISEMENT

मतमोजणीला सुरूवात

Mizoram Assembly Election Result Live Updates : मिझोरम विधानसभा निवडणूक 2023 च्या मतमोजणीला आयझॉल डीसी कार्यालयात सुरुवात झाली आहे. राज्यातील विधानसभेच्या 40 जागांसाठी ७ नोव्हेंबरला मतदान झाले होते. येथे मुख्य लढत मिझो नॅशनल फ्रंट आणि झोरम पीपल्स मूव्हमेंट यांच्यात होणार असल्याचे मानले जात आहे. या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसही लढत आहेत.

इंडिया एक्सिस माय इंडिया एग्झिटचा पोल काय सांगतो?

Mizoram Assembly Election Result Live Updates : इंडिया एक्सिस माय इंडिया एग्झिट पोलनुसार, मिजोरममध्ये झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) क्लीन स्वीपची संधी आहे. या पक्षाला निवडणूकीत 40 जागांपैकी 28-35 सीटें मिळवण्याची अपेक्षा आहे. तर नॅशनल फ्रंट (MNF) फक्त 3-7 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Mizoram Assembly Election Result Live Updates : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणा या राज्यातील निकाल रविवारी जाहीर झाला. या निकालात भाजपने तीन राज्यात बाजी मारली तर तेलंगणात काँग्रेस आली. त्यानंतर आज मिझोरम विधान परिषदेचा निकाल जाहीर होणार आहे. या निकालासाठीची मतमोजणी आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे.मिझोरममध्ये विधानसभेच्या 40 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान पार पडले होते. या राज्यात मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी नॅशनल फ्रंट (MNF), झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेस यांच्यात तिरंगी लढत झाली आहे. आता या निकालात कोण बाजी मारते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT