Mla Disqualification : ‘अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे’; CM शिंदे स्पष्टच बोलले
मेरिटवर अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल पाहिजे. मेरिटवर निकाल दिला पाहिजे. कारण पक्ष आम्ही आहोत. धनुष्यबाण आमच्याकडे आहे”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
ADVERTISEMENT
Eknath Shinde Reaction On MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेचा निकाल आता अवघ्या काही तासात लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी 4 वाजता निकालाचे वाचन करणार आहे. या निकालाआधी आता आमदार अपात्रता (MLA Disqualification) प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. अध्यक्ष महोदयांनी मेरीटवर निकाल दिला पाहिजे आणि आमच्या बाजूनेच निकाल दिला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मांडली आहे. (mla disqalification case rahul narwekar cm eknath shinde reaction vs udhhav thackeray maharashtra politics)
आमदार अपात्रता प्रकरणात ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. या आरोपावर मुख्यमंत्री म्हणाले की, “काही लोक यामध्ये मॅच फिक्सिंगचा आरोप करतात. मॅच फिक्सिंग म्हणजे काय… त्यांचे आमदार, विरोधी पक्षाचे लोक विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात जेवत होते, त्यावर आम्ही आक्षेप घेतला का? अध्यक्ष माझ्याकडे आले, ते त्यांच्या वाहनातून आले. रात्री लपून आले नाहीत. दिवसा आले. त्यांच्या मतदारसंघात जी कामे सुरू आहे, ते आमदार आहेत. त्यांच्या मतदारसंघातील कामे आणि इतर विषयावर अधिकाऱ्यांसोबत अधिकृत बैठक झाली. लपून छपून झाली नाही. चोराच्या मनात चांदणं असतं. लपून-छपून किंवा अंधारात आम्ही करत नाही. त्यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही”, असे सांगत शिंदेंनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिले.
हे ही वाचा : Mla Disqualification : अध्यक्ष काही याचिका फेटाळू शकतात; निकमांनी काय सांगितलं?
“मी एवढंच सांगतो की, शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला अधिकृत मान्यता निवडणूक आयोगाने दिली. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आयोगाने आम्हाला दिले. बहुमताच्या जोरावर.. म्हणजे विधानसभेत 67 टक्के बहुमत आमच्याकडे आहे. लोकसभेत 75 टक्के बहुमत आमच्याकडे असल्यामुळे निवडणूक आयोगाने पूर्णपणे आम्हाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली आहे”, असे शिंदे निकालापूर्वी म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
“जेव्हा त्यांच्या बाजूने निकाल लागतो, ती संस्था चांगली असते. जेव्हा त्यांच्या विरोधात निकाल लागतो, मग तो निवडणूक आयोग असेल, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केले आहेत. मेरिटवर अध्यक्षांनी आमच्या बाजूने निकाल पाहिजे. मेरिटवर निकाल दिला पाहिजे. कारण पक्ष आम्ही आहोत. धनुष्यबाण आमच्याकडे आहे”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
हे ही वाचा : Video : हृदयद्रावक! फलंदाजी करताना जागेवरच कोसळला, हार्ट अटॅकने तरूणाचा मृत्यू
“जे या सरकारला घटनाबाह्य म्हणतात, ते लोक घटनाबाह्य आहेत. कारण सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलेलं आहे की, पूर्व मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यामुळे सरकार अस्तित्वात नव्हतं. आमच्याकडे 164 लोकांचं बहुमत आमच्याकडे होतं. जेव्हा मतदान झालं तेव्हा 164 विरुद्ध 99 म्हणजे बहुमताचं सरकार आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यांच्या आदेशात राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी दिलेलं निमंत्रण न्याय ठरवलं आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT