Mla Disqualification : 7 ठरावांनी ठाकरेंचं टेन्शन वाढवलं, शिंदेंच्या वकिलांनी पकडलं कात्रीत

मुस्तफा शेख

ADVERTISEMENT

mla disqualification latest news : mahesh jethmalani arguments by shinde faction
mla disqualification latest news : mahesh jethmalani arguments by shinde faction
social share
google news

Mla Disqualification latest News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कोर्टात शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल आहे. या प्रकरणावरील सुनावणी अंतिम टप्प्यात असून, शेवटच्या दिवशी सकाळच्या सत्रात शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. यावेळी जेठमलानी यांनी 25 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने केलेल्या ठरावावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जेठमलानींनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढवलं आहे. (7 resolutions which were passed in meeting of national executive on the 25th June 2022)

राहुल नार्वेकर यांच्यासमोर महेश जेठमलानी यांनी शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद केला. जेठमलानी म्हणाले की, 25 जून 2022 रोजी 7 ठराव पारित करण्यात आले. माझ्या मते शिवसेनेची राज्यघटना 1991 ची आहे, त्यानंतरच्या सर्व गोष्टी बनावट आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, 2018 च्या सुधारणा रेकॉर्डवर नाहीत आणि निवडणूक आयोगाची प्रक्रिया पाळली गेली नाही.”

जेठमलानी यांनी मंजूर करण्यात आलेल्या ठरावांकडे विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधले. या ठरावावरील सदस्यांची नावे आणि स्वाक्षऱ्यांचा मुद्दा जेठमलानींनी उपस्थित केला. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने वा प्रतिनिधी सभेनं हे ठराव मंजूर केलेले आहेत. त्याबद्दल जेठमलानी म्हणाले की, “शिवसेनेच्या 1991 च्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणी वा प्रतिनिधी सभा असे काही नाहीये.”

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सात ठराव, पण तीनवरच कार्यकारिणी सदस्यांच्या सह्या

जेठमलानी म्हणाले की, 25 जून 2022 रोजी राष्ट्रीय कार्यकारिणीची जी बैठक झाली, त्यात सात ठराव मंजूर करण्यात आले. त्यावर सह्याच नाहीयेत. सात पैकी केवळ तीन ठरावांवरच सह्या असून, अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांच्या सह्या आहेत. या दोघांनाही साक्षीदार म्हणून उलटतपासणीसाठी बोलवले गेले नाही”, असा मुद्दा जेठमलानी यांनी उपस्थित केला.

ADVERTISEMENT

जेठमलानी म्हणाले, “राष्ट्रीय कार्यकारिणी आणि प्रतिनिधी सभा याचा वापर उद्धव ठाकरेंकडून एकच आहे, असा केला गेला आहे, मात्र त्या एकच नाहीत. या कागदपत्रांमध्ये कुठेही प्रतिनिधी सभेचा उल्लेख नाहीये, फक्त राष्ट्रीय कार्यकारिणीचा उल्लेख आहे.”

ADVERTISEMENT

25 जून 2022 रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावांपैकी सातव्या ठरावात बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची शिफारस करणारा ठराव आहे. ज्यावर अरविंद सावंत आणि विनायक राऊत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सहाव्या ठरावावर केवळ विनायक राऊत यांचीच स्वाक्षरी आहे. पाचव्या ठरावावर अरविंद सावंत याचीच स्वाक्षरी आहे.

एकनाथ शिंदेंना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदावरून काढण्याच्या ठरावावर रवींद्र वायकर यांच्यासह इतर सदस्यांच्या सह्या आहेत. यात उदय सामंत, दादा भुसे, संजय राठोड यांच्या सह्या आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT