Mla Disqualification : ठाकरेंना झटका; नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला काय सांगितलं?
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना मोठा दिलासा मिळाला. कोर्टाने निर्णय घेण्यासाठी आणखी वेळ वाढवून दिला.
ADVERTISEMENT

-अनिषा माथूर, दिल्ली
Mla Disqualification latest News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते की, 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून 31 डिसेंबरच्या आत निर्णय घ्या. पण, आता या प्रकरणावरील निकाल ठाकरेंना पुढच्या वर्षीच मिळणार आहे. राहुल नार्वेकरांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाने प्रकरणावरील निकाल 2024 मध्ये येणार, हे निश्चित झाले आहे.
शिवसेना आमदार अपात्रता याचिका प्रकरणाची सुनावणी घेत असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी (15 डिसेंबर) झालेल्या सुनावणीत कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला. नार्वेकरांनी केलेल्या मागणीला ठाकरेंच्या वकिलांनी विरोध केला, मात्र अखेर कोर्टात नार्वेकरांची मागणी मान्य झाली.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण : सुप्रीम कोर्टात काय घडलं?
राहुल नार्वेकर यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीच्या सरन्यायाधीश म्हणाले की, ‘अर्ज मिळत नाहीये. रेकॉर्ड बघायला आम्हाला थोडा वेळ द्या.’ त्यानंतर राहुल नार्वेकर यांच्यावतीने बाजू मांडतांना सॉलिसीटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलं की, “न्यायालयाने एक आदेश दिला होता. 20 डिसेंबरपर्यंत सुनावणी पूर्ण करून 31 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्यायला सांगितले आहे.”