Rajasthan: ‘तात्काळ Non Veg चे ठेले बंद करा’, निवडणूक जिंकताच भाजप आमदाराचा अधिकाऱ्याला फोन
राजस्थानमध्ये आता काँग्रेसचे सरकार जाऊन भाजपचे सरकार बनणार आहे. मात्र त्याआधीच राजस्थानमधील आमदार ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी थेट अधिकाऱ्याला फोन करत रस्त्यात खुलेआम मांसाहारचे पदार्थ विकणारी दुकाने आधी हटवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
ADVERTISEMENT

Rajasthan MLA : देशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे भाजपकडून आता सरकार बनवण्याचीही तयारी सुरू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून अजून 24 तासही उलटले नाहीत. तरीही आता निवडून आलेले सगळे आमदार ॲक्शन मोडवर (Action Mode) आले आहेत. त्यामुळे भाजपच्या एका आमदाराने (BJP MLA) आता अधिकाऱ्याला फोन करून संध्याकाळपर्यंत सर्व मांसाहार पदार्थ (Non-Veg) विकणारी दुकानं हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सरकारी अधिकाऱ्याला तंबी
हवामहलचे भाजप आमदार बालमुकुंद आचार्य यांनीच फोन करून सरकारी अधिकाऱ्याला तंबी दिल्याची घटना घडली आहे. त्यांनी सरकारी अधिकाऱ्याला फोन करुन रस्त्यात असलेली मांसाहारची दुकानं किंवा नॉन व्हेज पदार्थाची दुकान, हॉटेल बंद करण्याच्याच सूचना देण्यात आल्या आहेत. मांसाहारची दुकानं बंद करण्याच्या सूचना देताना त्यांनी अधिकाऱ्याला फोनवरून सांगितले की, संध्याकाळपर्यंत त्या रस्त्यावरची मांसाहारची सर्व दुकानं हटवली गेली पाहिजे आणि सगळी गल्ली साफ केली पाहिजे अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्याला फोन करून तंबीच दिली आहे.
रस्त्यावर खुलेआम मांसाहार
नुकताच निवडून आलेल्या आमदार बालमुकुंद आचार्य यांनी अधिकाऱ्यांना फोन करून तंबी देण्याचा विडाच उचलला आहे. यावेळी त्यांनी लोकांसमोरच संबंधित अधिकाऱ्याला फोन करत आदेश दिला आहे. फोन करून त्यांनी अधिकाऱ्याला प्रश्न विचारला की, आपण रस्त्यावर खुलेआम मांसाहार किंवा मांसाहारचे पदार्थ विकू शकतो का ? त्यांनी यावेळी हेही सांगितले की, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही फक्त होय किंवा नाही या दोनच शब्दात द्या. त्यानंतर त्यांनी त्यांना सांगितले की, आता जर रस्त्यावर मांसाहारची दुकानं असतील तर ती तात्काळ बंद करा.
हे ही वाचा >> Crime: उधारीमुळे कान गमावला, मित्राने तोडला कानाचा लचका!
कामाचा अहवाल द्या
हा फक्त आदेश नाही तर संध्याकाळी मला तुमच्या या कामाचा अहवालही पाहिजे अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले आहे. यावेळी त्यांनी हेही म्हटले आहे की, तुम्ही अधिकारी कोण आहात आणि काय करणार आहात ते मला माहिती नाही. त्याचा मला फरकही पडत नाही अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्याला इशारा दिला आहे.