Exclusive : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांचा जामीन फेटाळला, संपूर्ण प्रकरण काय?
गंभीर आर्थिक गुन्ह्यातील अर्जदाराचा खोलवर रुजलेला सहभाग आणि पुराव्याशी छेडछाड व खटला बिघडवण्याचा संशय व्यक्त करत कोर्टाने अविनाश भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
ADVERTISEMENT
येस बॅंक आणि डिएचएफएल बॅंक आर्थिक घोटाळ्यात आरोपी असलेले पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash bhosale) यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. गंभीर आर्थिक गुन्ह्यातील अर्जदाराचा खोलवर रुजलेला सहभाग आणि पुराव्याशी छेडछाड व खटला बिघडवण्याचा संशय व्यक्त करत कोर्टाने अविनाश भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.(mumbai court denies bail to avinash bhosale in yes bank loan fraud case)
ADVERTISEMENT
”सर्वसामान्यांचा पैसा आणि देशाची संपत्ती असलेला येस बॅंकेचा मोठा पैसा हडप करून आरोपीने गुन्हेगारी कट रचून बॅंकेची फसवणूक केली आहे”. ”फसवणूक आणि गुन्हेगारी कटाच्या या गुन्ह्याला राष्ट्र बळी पडले आहे” असे निरीक्षण नोंदवत मुंबईतील विशेष न्यायालयाने अविनाश भोसले (Avinash bhosale) यांचा जामीन अर्ज फेटाळला.
अविनाश भोसले यांनी यापूर्वी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यांचा हा जामीन अर्ज फेटाळताना विशेष न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी म्हटले की, “आर्थिक गुन्ह्यांना कठोरपणे सामोरे जावे लागते, ही एक कायदेशीर स्थिती आहे”. ”ज्या पद्धतीने ही फसवणूक झाली आहे, त्यामुळे अर्जदाराला जामीन देणे सुरक्षित नाही”.”पुराव्याशी छेडछाड करून खटला बिघडवण्याची आणि खटल्याला बाधा आणण्याची शक्यता आहे”.
हे वाचलं का?
हे ही वाचा : PUNE: ‘आता काय गचांडी धरु का?’ म्हणणाऱ्या अजितदादांचा चढला पारा, फडणवीसांवर थेट वार
”गंभीर आर्थिक गुन्ह्यात अर्जदाराचा सहभाग खोलवर रुजलेला आहे, हे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. तसेच या प्रकरणात झालेली फसवणूक खूप मोठी आहे, म्हणजे सुमारे ₹ 4000 कोटी.”, असे देखील न्यायाधीशांनी यांनी म्हटले आहे.
दरम्यान विशेष न्यायालय उन्हाळ्याच्या सुट्टीवर असताना अविनाश भोसले यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी त्यांची जामिनावर तात्काळ सुटका करण्यात यावी, यासाठी प्रभारी न्यायालयात जामीनासाठी धाव घेतली होती, असे न्यायालयाने नमूद केले. प्रभारी न्यायालयाने 19 मे 2023 रोजी अर्ज फेटाळला होता. “म्हणून, त्याच आधारावर या अर्जावर विचार करता येणार नाही..,” असे देखील न्यायाधीश म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL)चा समावेश असलेल्या येस बँकेतील कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयने 22 मे 2022 रोजी अविनाश भोसले यांना अटक केली होती. यानंतर अंमलबजावणी संचालनालयानेही त्यांना ताब्यात घेतले होते.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT