Shiv Sena: ‘ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार हे आम्हाला माहितीच…’ भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbai tak chavdi shiv sena we didnt know that uddhav thackeray would form an alliance with congress ncp in 2019 claims mla bharat gogawale
mumbai tak chavdi shiv sena we didnt know that uddhav thackeray would form an alliance with congress ncp in 2019 claims mla bharat gogawale
social share
google news

Bharatshet Gogawale Mumbai Tak Chavdi मुंबई: शिवसेना (UBT)ने काल (16 जानेवारी) मुंबईत महापत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना पक्षांतर्गत झालेली निवडणूक आणि नेत्यांची नेमणूक याचे व्हिडीओच दाखवून ठाकरेंनी शिंदे आणि त्यांच्या गटाची पुरती कोंडी केली आहे. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार आणि आता ज्यांना अधिकृत प्रतोद म्हणून नेमण्यात आलं त्या भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांनी मुंबई Tak च्या चावडीवर (Mumbai Tak Chavdi) एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. (mumbai tak chavdi shiv sena we didnt know that uddhav thackeray would form an alliance with congress ncp in 2019 claims mla bharat gogawale)

ADVERTISEMENT

2019 साली उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणार हे आपल्याला माहितीच नव्हतं असा दावा भरत गोगावले यांनी मुंबई Tak च्या चावडीवर बोलताना केला आहे.

हे ही वाचा>> Maharashtra Politics : बाळासाहेबांनी रात्रीत डाव फिरवला अन् देवरा…; शिवसेनेचा ‘तो’ किस्सा

पाहा याबाबत भरत गोगावले नेमकं काय म्हणाले..

प्रश्न: तुम्ही म्हणालात की, आम्ही एक क्षणही बाळासाहेबांच्या विचाराविरोधात जाणार नाही. 2019 ला जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तेव्हा तुम्ही किंवा शिवसेनेच्या आमदारांनी एकमेकांना पुरणपोळ्या भरवलेल्या.. त्यावेळी तुम्ही ठाकरेंना विरोध का नाही केला?

हे वाचलं का?

भरत गोगावले- त्यावेळेला मी पुरणपोळ्या खाल्ल्या नाही. मला शुगर असल्यामुळे मी पुरणपोळ्या खाल्या नाही. जसं पेरलं तसं उगवलं. त्याचवेळेला उद्धव साहेबांनी ते स्वीकारलं नसतं तर हे दिवस आले नसते. आमच्या सगळ्या आमदारांचा नकार होता.

ज्यावेळेला भाजपने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सकाळी जी काही शपथ घेतली त्या अनुषंगाने विस्कळीतपणा झाला होता. जे काही उद्धव साहेबांनी जुळवलं ते आम्हाला माहिती नव्हतं. हे आम्ही नेहमी सांगत आलोय.

शुगर असलेल्या माणासांना डॉक्टर इच्छा नसताना सांगतात की कारल्याची भाजी खा, मेथीची भाजी खा.. तेव्हा खाल्ली आम्ही.. पण ती किती दिवस खायची.. हा प्रश्न झाला.. म्हणून आता ते आम्ही थांबवलं. असं उत्तर भरत गोगावले यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, भरत गोगावले यांचा असा दावा असला तरी 2019 विधानसभा निवडणूक निकालाच्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन अडीच वर्ष मुख्यमंत्री पद मिळालं नाही तर माझ्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत असं जाहीरपणे सांगितलं होतं.

हे ही वाचा>> ‘प्रणिती आणि मला भाजपची ऑफर’, सुशील कुमार शिदेंचा मोठा गौप्यस्फोट

याशिवाय त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी सुरू केलेली चर्चा.. त्यांच्या नेत्यांच्या भेटीगाठी हे सगळं माध्यमांसमोरच घडत होतं. मात्र, असं असताना देखील भरत गोगावले यांनी असा दावा केला आहे की, उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जातील हे आपल्याला माहितीच नव्हतं. आता त्यांच्या याच विधानानंतर अनेकांनी आश्चर्य देखील व्यक्त केलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT