Fact Check: मुंब्य्राचा 'तो' Video अन् राज ठाकरेंना विचारतायेत जाब.. काय आहे हे सगळं प्रकरण?
Marathi Language :मराठी भाषेसाठी मनसे जी काही आंदोलनं करत आहेत. ते पाहता आता एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे. जाणून घेऊया या व्हिडिओची नेमकी सत्यता काय.
ADVERTISEMENT

मुंबई: बँका आणि इतर आस्थापनांमध्ये मराठीतूनच व्यवहार झाले पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या राज ठाकरे आणि मनसेला आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ टॅग करून यूजर्स काही सवाल विचारत आहेत.
'तो' Viral Video राज ठाकरेंना का केला जातोय टॅग?
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. हा व्हिडिओ मुंब्रा येथील काही महिन्यांपूर्वीचा आहे पण सध्या हाच व्हिडिओ राज ठाकरेंना टॅग केला जात आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या बराच व्हायरल होतो आहे. व्हिडिओमध्ये काय दिसतंय तर एक मुलगा माफी मागतोय आणि त्याच्या आजूबाजूचे लोक हे त्याला 'हिंदीमधून माफी माग' असा आग्रह करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे तो आत्ताच का व्हायरल होतोय आणि राज ठाकरेंचं नाव घेत तो त्यांना का टॅग का केला जातोय? या व्हिडिओ चं नेमकं सत्य काय आहे? हेच आपण आता सविस्तर जाणून घेऊया.
हा व्हिडिओ नेमका काय आहे तो कधीच आहे हे सगळं जाणून घेण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करताना यूजर्स काय म्हणत आहेत. ते आपण आधी पाहूया.