नगर परिषद निवडणूक: उद्या नाही निवडता येणार तुमचा नगरसेवक, 'या' वॉर्डातील मतदान लांबणीवर.. पाहा संपूर्ण यादी!
महाराष्ट्रातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील एकूण 154 सदस्य पदांसाठीची निवडणूक ही पुढे ढकलण्यात आली आहे. पाहा कोणकोणत्या वॉर्डातील सदस्यांची निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने काल (30 नोव्हेंबर) अचानक राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत एक मोठा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये राज्यातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींमधील एकूण 154 सदस्य पदांसाठी 2 डिसेंबर रोजी होणारे मतदान आता 20 डिसेंबर रोजी होणार आहे. हा निर्णय न्यायालयीन अपील आणि प्रभाग रचना विवादांमुळे घेण्यात आला असून, यामुळे 24 नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकीवर थेट परिणाम झाला आहे.
2 डिसेंबरऐवजी 20 डिसेंबरला होणार मतदान
आयोगाने कायद्याचे पालन करत सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे मूळतः 2 डिसेंबरला होणाऱ्या 154 सदस्य पदांच्या निवडणुका आता 20 डिसेंबरला होणार असून, निकाल 21 डिसेंबरला जाहीर होईल.
हे ही वाचा>> उद्या 'या' नगर परिषदांमध्ये होणार नाही मतदान, तुमची नगरपालिका आहे का 'या' यादीत?
या प्रक्रियेत 10 डिसेंबरपर्यंत उमेदवारांना माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. उर्वरित नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या सदस्यांचा निवडणुका मात्र 2 डिसेंबरलाच होतील. ज्यात सदस्य आणि नगराध्यक्ष पदांसाठी मतदान होईल. राज्यातील एकूण 3820 प्रभागांपैकी या 154 पदांना स्थगिती लागू आहे.
'या' जिल्हातील नगर परिषद आणि नगर पंचायतीमधील सदस्यांच्या निवडणुका ढकलल्या पुढे!
पुणे जिल्ह्यातील एकूण 10 जागांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या










