उद्या 'या' नगर परिषदांमध्ये होणार नाही मतदान, तुमची नगरपालिका आहे का 'या' यादीत?
Nagar Parishad Elections: महाराष्ट्रातील काही नगर परिषदा व नगर पंचायती निवडणुका या 20 डिसेंबरपर्यंत ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता या नगर परिषदा आणि नगर पंचायतींमध्ये उद्या (2 डिसेंबर) मतदान होणार नाही.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रक्रियेत अचानक मोठा बदल घडला आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 20 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मूळतः २ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणुकांचे मतदान आता 20 डिसेंबर रोजी होईल, तर निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. हा निर्णय प्रचाराच्या शेवटच्या तासांत घेतला गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
निर्णयाचे मुख्य कारण: न्यायालयीन अपील व प्रभाग रचना विवाद
निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, या निवडणुका पुढे ढकलण्यामागे न्यायालयीन कारणे आहेत. काही नगर परिषदांमध्ये प्रभाग रचनेवरून (ward delimitation) अनेक अपील कोर्टात प्रलंबित आहेत. सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले असल्याने, आयोगाने या प्रलंबित प्रकरणांचा विचार करून निर्णय घेतला. विशेषतः ज्या ठिकाणी प्रभागांचे वाटप किंवा आरक्षणाबाबत वाद आहे, त्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित करण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा>> निवडणूक आयोगाने कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
या निर्णयामुळे मूळ कार्यक्रमानुसार 10 नोव्हेंबरला अर्ज दाखल करण्याची मुदत संपलेल्या उमेदवारांना आता 10 डिसेंबरपर्यंत माघार घेण्याची संधी मिळाली आहे. उर्वरित ठिकाणच्या निवडणुका मात्र 2 डिसेंबरनुसारच पार पडतील, ज्यात 236 नगर परिषदांच्या मुदत संपलेली असून, 10 नवनिर्मित नगर परिषदांचा समावेश आहे. तसेच, 42 नगर पंचायतींपैकी 105 ची मुदत अजून संपलेली नाही.
निवडणूक आयोगाने कोणत्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या?
- या नगर परिषदांच्या निवडणुका ढकलल्या पुढे










