Santosh Deshmukh Murder: 'वाल्मिक कराडच्या आदेशावरूनच खून झाला', सुरेश धस प्रचंड आक्रमक

मुंबई तक

'वाल्मिक कराड याच्या आदेशावरूनच खून झाला', असा थेट आरोप आता भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी चार्जशीट दाखल झाल्यानंतर ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आता सगळ्यात खळबळजनक माहिती समोर आली आहे. या हत्येचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड हाच आहे अशा थेट आरोप सीआयडीने चार्जशीटमध्ये केला आहे. एवढंच नव्हे तर खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या हे तीनही गुन्हे एकत्रित करून ही चार्जशीट दाखल केली असल्याचं आता समोर आलं आहे. 

दरम्यान, हे प्रकरण पहिल्या दिवसापासून उचलून धरलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी आता त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी फोनवरून बोलताना त्यांनी आता अनेक धक्कादायक आरोप केले आहेत.

हे ही वाचा>> Walmik Karad हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मास्टर माईंड, CID चं आरोपपत्र

प्रत्यक्ष वाल्मिक कराडच्या आदेशावरूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली. असा थेट आरोप आता सुरेश धस यांनी केला आहे. पाहा नेमकं काय म्हणाले सुरेश धस.

वाल्मिक कराडविरोधात चार्जशीट दाखल, सुरेश धस प्रचंड आक्रमक

चार्जशीट झाल्यानंतर सुरेश धस म्हणाले की, 'वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड, मुख्य सूत्रधार, याचा आका.. सगळं काही तोच आहे. हा आकाच सगळं काही करत होता. संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये यांनी धुमाकूळ घातला होता. जे गुंड प्रवृत्तीचे लोकं आहेत यांना सहकार्य करणं, मदत करणं, पैसे देणे...  कारण पैसा जास्त झाला ना.' 

हे वाचलं का?