Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडचा हत्येत सहभाग, चार्जशीटमध्ये खळबळजनक आरोप

मुंबई तक

Walmik Karad Chargesheet : बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपी वाल्मिक कराडविरोधात सीआयडीकडून 1400 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Walmik Karad
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराडविरोधात 1400 पानी आरोपपत्र दाखल

point

चार्जशीटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

point

वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभाग?

Walmik Karad Chargesheet : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाची सूत्रे सरकारी वकील उज्ज्व निकम यांच्याकडे सोपवण्यात आलीय. बीडच्या विशेष मकोका कोर्टात आरोपी वाल्मिक कराडविरोधात सीआयडीकडून 1400 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. संतोष देशमुखांच्या हत्येत वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचा खळबळजनक आरोप या चार्जशिटमध्ये करण्यात आला आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी वाल्किम कराडसह अन्य आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काय आहे आरोपपत्रात?

  • वाल्मीक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणातला सहभाग आणि त्याचे पुरावे
  • सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणारे सात आरोपींनी कशाप्रकारे हत्येचा कट रचला आणि हत्या केली याचे पुरावे
  • या हत्याकांडात कुणाकुणाचा सहभाग आहे, याचा तपास 
  • संतोष देशमुख यांच्या हत्येचं मूळ कारण समोर येणार
  • खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सहभाग आहे का? याचा तपास समोर येणार
  • खंडणी प्रकरण त्यानंतर ॲट्रॉसिटी प्रकरण आणि हत्या प्रकरण या तिन्ही प्रकरणाचा एकमेकाशी काही संबंध आहे का? याचे पुरावे..
  • या प्रकरणातील आरोपींना फरार होण्यात कोणी सहकार्य केले आरोपी फरार झाल्यानंतर कुठे होते काय केले यासंदर्भातील ही सत्य दोषारोप पत्रातून समोर येणार

हे ही वाचा >> Pune : स्वारगेट बलात्कार प्रकरण: तरुणीसोबत नेमकं काय घडलं? कोर्टातील A टू Z युक्तिवाद!

  •  सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना आरोपींनी वापरलेले शस्त्र आणि हत्या नेमकी कशा पद्धतीने झाली याचेही सत्य समोर येणार
  • संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली का आणि दोषी आहेत का याचेही सत्य सीआयडीच्या तपासातून समोर येणार
  • या प्रकरणाशी संबंधित असलेल्या कुणाकुणाची चौकशी झाली हे देखील दोषारोपपत्रमधून समोर येणार
  • वाल्मीक कराड यांनी खंडणी प्रकरणातून जमा केलेल्या संपत्ती संदर्भातील माहिती देखील समोर येणार का ? 
  • वाल्मीक कराड सुदर्शन घुले यांच्या संघटित गुन्हेगारीचे आणखी काही प्रकार घडले होते का? तसेच आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी यासंदर्भातही आरोप पत्रात सविस्तर माहिती. 
  • डिजिटल पुराव्यामधून या प्रकरणाशी संबंधित असलेल्या आणि सीडीआर मधून या प्रकरणाशी कुणाकुणाशी संपर्क झाला हे देखील सत्य समोर येऊ शकते. 
  • एकूण चौदाशे पानांचं आरोप पत्र आज बीडच्या विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले.

हे ही वाचा >> पोटच्या तीन मुलींवर वासनांध बापाकडून वारंवार बलात्कार, एका मुलीचा 4 वेळा गर्भपात

हे वाचलं का?

    follow whatsapp