पोटच्या तीन मुलींवर वासनांध बापाकडून वारंवार बलात्कार, एका मुलीचा 4 वेळा गर्भपात
नालासोपारा येथे एका वासनांध व्यक्तीने स्वत:च्या तीन मुलींवर पाशवी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्याप्रकरणी आता आरोपीला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नालासोपाऱ्यात एक धक्कादायक घटना उघडकीस
बापानेच केला स्वत:च्या तीन मुलींवर बलात्कार
पीडित मुलींपैकी एका मुलीचा तीन वेळा गर्भपात
नालासोपारा: पुण्यातील स्वारगेट प्रकरणातील आरोपी पकडला गेला. या घटनेला एक दिवस होत नाही तर आता आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. ऐकून अंगावर शहारे येतील आणि किळस वाटेल अशी घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. वडील आणि मुलींचं नातं खास असतं असं म्हणतात, पण एका बापानं आपल्याच पोटच्या एक नव्हे तीन-तीन मुलींवर पाशवी बलात्कार केल्याची अत्यंत धक्कदायक घटना समोर आली आहे.
पीडित मुलींमधील एका मुलीनं तक्रार केल्यानंतर हा सगळा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहे. ज्यानंतर सगळ्यांनाच मोठा हादरा बसला आहे.
नेमकं प्रकरण काय?
कोकणातल्या कणकवलीत एक कुटुंब राहत होतं. आई-वडील आणि 5 मुली. पण त्यापैकी तीन मुलींवर वडिलांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. 56 वर्षाच्या या नराधम बापाने स्वत:च्याच मुलींचा लैंगिक छळ केला.
हे ही वाचा>> Pune: पाणी प्यायला गेला अन् पोलिसांना सापडला, नराधम दत्तात्रय गाडेच्या अटकेची Inside Story
ज्या तीन मुलींवर त्यानं अत्याचार केले त्यातील एक मुलगी 21 वर्षांची होती तर इतर दोन मुली अल्पवयीन आहेत. या तीनमधल्या एका मुलीचा तब्बल 4 वेळा गर्भपातही करण्यात आला आहे. म्हणजे हा सगळा घृणास्पद प्रकार मागील अनेक वर्षांपासून सुरू होता. जो पीडित मुली या निमूटपणे सहन करत होत्या. या सगळ्या मुलींना कोणत्या मरणयातना सहन कराव्या लागल्या याचा विचारही आपण करू शकत नाही.










