भाजपच्या बालेकिल्ल्यात ‘मविआ’ची मुसंडी, नांदेड कृषी समितीत शेकापने उधळलला गुलाल

ADVERTISEMENT

nanded apmc agricultural produce market committee election maha vikas aghadi wins bjp defeats
nanded apmc agricultural produce market committee election maha vikas aghadi wins bjp defeats
social share
google news

Nanded News: राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता असली तरी त्याच्या उलट चित्र नांदेड जिल्ह्यात (Nanded APMC) घडलं आहे. कारण नांदेड जिल्ह्यातील 6 कृषी उत्पन्न बाजार समितीचा (Agricultural Produce Market Committee) निकाल रविवार जाहीर झाला. यावेळी लोहा बाजार समितीमध्ये (Loha APMC) मात्र धक्कादायक निकाल लागला आहे. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या आणि भाजपाचे खासदार प्रताप पाटील (BJP MP Pratap Patil) चिखलीकर यांचा गड असलेल्या लोहा तालुक्यात त्यांना जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत तेथील एकूण 18 जागांपैकी 16 जागांवर महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) पुरस्कृत पॅनलने बाजी मारली आहे.

निवडणूक प्रतिष्ठेची

लोहा बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारलीये. या विजयामुळे खासदार चिखलीकर यांना मोठा धक्का मानला जातो आहे. एकूण 18 जागां पैकी तब्बल 16 जागांवर महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने बाजी मारली आहे. आमदार श्यामसुंदर शिंदे ( MLA Shyamsundar Shinde) आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

हे ही वाचा >> Assembly Elections : बिगुल वाजला! राजस्थान, मध्य प्रदेशसह 5 राज्यांचा 3 डिसेंबरला निकाल

चिखलीकरांना मोठा धक्का

महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी पॅनलने मिळवलेल्या विजयामुळे खासदार चिखलीकर यांना मोठा धक्का मानला जातो आहे या विजयानंतर आमदार श्यामसुंदर दंड थोपटून शक्ती प्रदर्शन केलं, तर जिल्ह्यातील मुखेड येथे भाजपला 18 पैकी 17 जागा मिळाल्यास त्यातील 1 जागा महाविकास आघाडीला मिळाली आहे. बिलोली येथे 18 पैकी 17 जागांवर महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> ‘…तर टोलनाके जाळून टाकू’; राज ठाकरेंचा इशारा, फडणवीसांचा दाखवला व्हिडीओ

‘मविआ’चे वर्चस्व

कोंडलवाडीतही महाविकास आघाडीला 18 पैकी 17 जागा मिळाल्या आहेत. तर उमरीत तर 18 च्या 18 जागांवर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. तर माहूर मध्ये शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने 14 जागा मिळवत मार्केट कमिटी ताब्यात घेतली आहे. एकंदरीत नांदेड जिल्ह्यातील 6 पैकी 5 मार्केट कमिटीवर महाविकास आघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT