राष्ट्रवादीला मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द

ADVERTISEMENT

National Party status of NCP canceled by Central Election Commission
National Party status of NCP canceled by Central Election Commission
social share
google news

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आयोगाकडून रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रीय पक्षासाठी आवश्यक असणारे संख्याबळ राष्ट्रवादीकडे नसल्याने आयोगाने आज (सोमवारी) हा दर्जा काढून घेतला आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश, मणिपूर आणि गोवा या राज्यांमधील राज्य पक्ष म्हणूनही राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे. (National Party status of NCP canceled by Central Election Commission)

राष्ट्रवादीशिवाय तृणमूल काँग्रेस आणि भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द काढून घेण्यात आला आहे. त्याचवेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला नवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. पंजाब, गोवा आणि गुजरात या विधानसभा निवडणुकांमधील कामगिरीनंतर आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यावर शिक्कामोर्तब झाला होता. त्यानुसार आम आदमी पक्ष आता देशातील सहावा राष्ट्रीय पक्ष ठरला आहे.

अदाणी, सावरकर, मोदींची डिग्री; शरद पवारांच्या गुगलीने विरोधकांचाच बिघडला खेळ!

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असल्यास काय फायदा होतो?

राष्ट्रीय पक्षाचा दर्जा असल्यास पक्षाला सगळ्या राज्यांमध्ये एकाच चिन्हावर निवडणूक लढता येते. तसंच, राजधानी दिल्लीत पक्ष कार्यालयासाठी जागाही मिळते. सरकारी प्रसारमाध्यमांवरील जाहिरातींमध्ये सवलत मिळते. त्यामुळे, प्रत्येक पक्ष हा दर्जा टिकवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करत असतो. मात्र आता राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काय निकष आहेत?

 • लोकसभेच्या एकूण जागांच्या किमान २ टक्के जागा ३ राज्यांमधून. म्हणजेच लोकसभेत ३ राज्यांमधून किमान ११ खासदार.
 • लोकसभेत किमान ४ खासदार. सोबतच ४ राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये किमान ६ टक्के मत.
 • किमान ४ राज्यांमध्ये संबंधित पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा.

राज्य पक्षाचा दर्जा मिळवण्याचे निकष आहेत?

 • संबंधित पक्षाला त्या राज्यात विधानसभा निवडणुकीत किमान ८ टक्के मत
 • संबंधित पक्षाला त्या राज्यात विधानसभा निवडणुकीत किमान ६ टक्के मत आणि २ विधानसभा सदस्य
 • संबंधित पक्षाचे त्या राज्यात किमान ३ विधानसभा सदस्य.

Shiv Sena UBT : “शिंदे गटात सरळ दोन गट पडलेत, उद्याच्या बेदिलीची ठिणगी…”

राष्ट्रवादी काँग्रेसची देशभरातील ताकद किती आहे?

 • राष्ट्रवादीचे लोकसभेत ५ आणि राज्यसभेत ४ खासदार आहेत.
 • महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादीचे ५४ आमदार आहेत.
 • नुकत्याच झालेल्या नागालँडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ७ आमदार निवडून आलेत.
 • राष्ट्रवादीचे केरळ विधानसभेत २ तर
 • गुजरात विधानसभेत १ आमदार आहे.

सध्याचे देशातील राष्ट्रीय पक्ष :

 1. भारतीय जनता पक्ष (भाजप)
 2. काँग्रेस
 3. बहुजन समाज पक्ष (BSP)
 4. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)
 5. नॅशनल पीपल्स पार्टी (NPP)
 6. आम आदमी पक्ष

  follow whatsapp

  ADVERTISEMENT