MLA: सत्तेत सहभागी झाले तरी नरहरी झिरवळ म्हणाले, ‘शिवसेनेचे आमदार अपात्र होणार!’
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नुकतेच सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेना आमदार अपात्र होतील असं खळबळजनक विधान केलं आहे.
ADVERTISEMENT

रायगड: मुख्यमंत्री एकनाथ शिदेंसह (Eknath Shinde) शिवसेनेच्या (Shiv Sena) 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेनेच्या आमदारांना नोटीसही बजावल्या आहेत. पण नुकतेच सत्तेत सामील झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) यांनी शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबद्दल अत्यंत खळबळजनक असं विधान केलं आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेत देखील संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. (ncp mla legislative assembly deputy speaker narahari ziraval shinde fadnavis government sensational statement shiv sena mlas will be disqualified)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी नरहरी झिरवळ हे थेट रायगडला गेले होते. यावेळी झिरवळ यांनी आमदारांच्या अपात्रतेबद्दल एक विधान केलं जे शिवसेनेच्या आमदारांना चांगलंच झोंबलं आहे
झिरवळ म्हणतात… शिवसेनेचे आमदार अपात्र होणारच!
‘एकूण सगळ्या बाजूचा विचार केला तर अपात्रता आहे. पण शेवटचे अधिकार हे अध्यक्षांचे त्या विधीमंडळाचे आहेत. त्यामुळे त्यावर भाष्य करणं मी योग्य नाही.’ असं मोठं विधान नरहरी झिरवळ यांनी रायगडमध्ये बोलताना केलं आहे.
झिरवळांचं ‘ते’ विधान शिवसेनेला झोंबलं!
‘मी नरहरी झिरवळ यांना सुद्धा सांगतो की, आपण अपेक्षेपेक्षा जास्त बोलू नका.. जो तुम्हाला अधिकार नाही ना.. त्या अधिकारावर माणसाने बोलू नये.’ अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी दिली आहे.