पुण्यात राडा! लक्ष्मण हाकेंचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, मद्यधुंद असल्याचा मराठा तरुणांचा दावा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Laxman Hake Video Clip Viral
Laxman Hake Latest News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लक्ष्मण हाकेंचा दारु पिल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं वातावरण तापलंय

point

मराठा आंदोलकांविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

point

पुण्यात नेमकं काय घडंलय?

Manon Hake Drunk Video Viral : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात वातावरण तापलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठा आंदोलक आणि ओबीसी कार्यकर्ते आमनेसामने आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हाके यांनी मद्यसेवन करून सार्वजनिक ठिकाणी राडा केल्याचा आरोप मराठा तरुणांनी केला आहे. लक्ष्मण हाकेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके यांचा मद्यधुंद अवस्थेत असलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. मराठा तरुणांनी हाके यांना याबाबत जाब विचारल आणि त्यांना कोंढवा पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर आक्रमक झालेल्या मराठा आंदोलनकांनी हाकेंची मेडिकल टेस्ट करावी, अशी मागणी केली. या सर्व घडामोडीनंतर हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली.

इथे पाहा व्हिडीओ

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यानंतर हाकेंचा प्राथमिक अहवालात त्यांनी मद्यसेवन केलं नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान, हाकेंच्या मद्यसेवनाबाबत सत्य परिस्थिती समोर यावी, यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुनेही वैद्यकीय प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवण्यात आले. परंतु, लक्ष्मण हाके यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर जवळपास 25 मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT