Lok Sabha 2024 Election : महायुतीची ताकद वाढणार! ठाकरे भाजपसोबत जाणार? 

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

मनसे भाजप युती होणार, मनसे नेत्यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक.
MNS leaders Bala Nandgaonkar, Sandip Deshpande and Nitin Sardesai had a courtesy meeting with DCM Devendra Fadnavis.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मनसे नेते राज ठाकरे यांच्यासोबतच्या भाजप नेत्यांच्या भेटी

point

फडणवीसांची मनसेच्या तीन नेत्यांसोबत बैठक

point

राज ठाकरेंची मनसे महायुतीत येणार?

BJP MNS Alliance In Lok Sabha Election : आधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला सोबत घेतलं. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी घरोबा केला. आता भाजप आणखी एका पक्षाला महायुतीत घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंची मनसे महायुतीत दिसण्याची शक्यता आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांची तीन नेत्यांसोबत बैठक झाली असून, त्यात युतीसंदर्भात चर्चा झाल्याचे सुत्रानी सांगितले. (There is Chances to BJP may be Alliance With MNS for Lok Sabha 2024 Election)

ADVERTISEMENT

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि भाजपसोबत युती होऊ शकते, अशी चर्चा होत असते. पण, आता त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे. पक्षाचे राज्यातील महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची मनसेच्या तीन नेत्यांसोबत बैठक झाली. 

मनसेच्या कोणत्या नेत्यांसोबत फडणवीसांची झाली बैठक?

मंगळवारी (६ फेब्रुवारी) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय बंगल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तीन नेत्यांसोबत बैठक झाली. मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे तिघे या बैठकीला हजर होते. 

हे वाचलं का?

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मनसेचे तीन नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा झाली. प्राथमिक बोलणीमध्ये लोकसभा निवडणूक एकत्र लढण्याचा मुद्दा होता. राज ठाकरे यांनी युतीबद्दल चर्चा करण्यासंदर्भातील जबाबदारी या तीन नेत्यांवर सोपवली असून, जागा वाटपाबद्दल अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. 

मनसेबद्दल भाजप सकारात्मक?

दोन अडीच वर्षात मनसे नेते राज ठाकरे यांच्यासोबतच्या भाजप नेत्यांच्या भेटी वाढल्या आहेत. तेव्हापासून मनसे भाजप एकत्र येऊ शकतात, असे म्हटले जात आहे. भाजपच्या नेत्यांकडून याला दुजोरा दिला गेला नाही, पण युतीचे संकेत अप्रत्यक्षपणे दिले होते.

ADVERTISEMENT

"राज आणि आमचे वैचारिक साम्य आहे. ते नेहमी हिंदुत्वाची बाजू मांडून रक्षण करत आले आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेणे गैर नाही', असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे एकदा राज ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाले होते. त्यानंतर आता मनसे नेते आणि देवेंद्र फडणवीसांची बैठक झाल्याने महायुतीत सामील होण्याच्या दिशेने पहिले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT