Eknath Khadse : शरद पवारांची साथ आताच का सोडली? अखेर खडसेंनी दिलं उत्तर

हर्षदा परब

ADVERTISEMENT

एकनाथ खडसे यांनी दिल्लीतील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला

point

शरद पवारांची राष्ट्रवादी खडसेंनी का सोडली?

point

एकनाथ खडसे यांची महत्त्वाची मुलाखत

Eknath Khadse BJP : काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला. शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचे कारणही एकनाथ खडसेंनी सांगितले. (Why did Eknath Khadse decide to join BJP again?)

ADVERTISEMENT

एकनाथ खडसे म्हणाले की, "एकतर अनेक वर्षांपासून भाजपच्या जुन्या आणि नवीन नेत्यांशी माझे केंद्रीय पातळीवर चांगले संबंध आहेत. बऱ्याचदा चर्चा होत असताना केंद्रीय पातळीवरील नेते तुम्ही भाजपमध्ये या... तुम्ही बरेच दिवस काम केले, वगैरे अशी चर्चा व्हायची."

"त्या चर्चेच्या माध्यमातून काहीजण आग्रही व्हायचे की आता निवडणूक आलेली आहे, तुम्ही या. या कालखंडात तिकडे जाणे जरा अवघड वाटतं होतं. पण, आता मी माझा निर्णय घेतलेला आहे की, मला भाजपमध्ये परत जायचं आहे", असे खडसे सुरुवातीला म्हणाले. 

हे वाचलं का?

कोणत्या कारणामुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला?

या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले, "भाजप हे माझं जुनं घर आहे. या घराच्या बांधकामापासून ते आताच्या स्टेजपर्यंत माझं काम राहिलेलं आहे. कुठे न कुठे, कमी अधिक प्रमाणात माझं योगदान आहे. या घरामध्ये ४०-४२ वर्ष राहिलेलो आहे. अशा स्थितीत थोडी नाराजी झाली... काही नेत्यांसोबत होती. पण, ती नाराजी झाली म्हणून मी बाहेर पडलो."

हेही वाचा >> मविआत घमासान! पटोले म्हणाले, "संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी"

"बाहेर पडल्यानंतर आता त्या नाराजीची तीव्रता कमी झाली. म्हणून मी भाजप स्वगृही परत येतोय. माझं घर आहे, मी माझ्या घरात परत येतोय याचं समाधान मला वाटतंय", असे उत्तर खडसेंनी दिले. 

ADVERTISEMENT

आताच हा निर्णय का घेतला?

"माझा दिल्लीतील नेत्यांशी संपर्क तुटलेला नव्हता. गेल्या तीन-चार वर्षात आम्ही भाजपवर टीका केली किंवा मोदीजींवर टीका केली, असं एकही उदाहरण नाही. मी व्यक्तिगत कारणासाठी नाराजीमुळे भाजपमधून बाहेर पडलो. ती नाराजी माझी कमी झाली आणि मी परत आलो. मधल्या कालखंडात माझ्या भेटीगाठी गडकरींकडे कामानिमित्त व्हायच्या. रावसाहेब दानवे असतील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा व्हायची. कधी दरेकरांसोबत चर्चा व्हायची."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> सुप्रिया सुळेंना अजित पवारांचा धक्का, प्रचारप्रमुखच फोडला!

"माझा संपर्क तुटला, असं काही नव्हतं. आता मला असं वाटलं की, या परिस्थितीमध्ये आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी मला मदत केली. याबद्दल मी त्यांचा ऋणी पण आहे. माझी सर्व परिस्थिती शरद पवारांना माहिती आहे. या प्रवेशासंदर्भात थोडी कल्पना मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली होती", असे खडसे यांनी सांगितले.

हेही वाचा >> "पक्ष सोडला नाही तर तुरूंगात जावे लागेल", राऊतांचा चव्हाणांबद्दल मोठा दावा 

"जयंत पाटलांनी आग्रह धरला की सोडू नये. पण, मी त्यांना माझी परिस्थिती समजून सांगितली. मला आता जाण्याची गरज का आहे. त्याप्रमाणे त्यांची सहमती जरी नाही मिळाली, तर त्यांच्या कानावर विषय घालून मी इकडे आलेलो आहे", अशी भूमिका एकनाथ खडसेंनी मांडली. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT