Article 370 Verdict : सुप्रीम कोर्टाने निर्णय ठरवला वैध; पंतप्रधान मोदी म्हणाले, “हा निर्णय…”
सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय हा केवळ कायदेशीर दस्ताऐवज नसून तो एक मोठा आशेचा किरण आहे. त्यात उज्ज्वल भविष्याचे वचन आहे आणि अखंड भारत निर्माण करण्याचा सामूहिक संकल्प असल्याचे मोदी म्हणतात.
ADVERTISEMENT
PM Narendra Modi Reaction on Article 370 Supreme Court Verdict : जम्मू काश्मीरमधून (Jammku Kashmir) 370 कलम हटवण्याचा केंद्राचा निर्णय योग्यच होता. हा निर्णय संविधानाला धरूनच होता. आणि कलम 370 हटवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, असा निकाल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) देऊन केंद्र सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. याच निकालावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय हा केवळ कायदेशीर दस्ताऐवज नसून तो एक मोठा आशेचा किरण असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. (pm narendra modi first reaction on article 370 verdict hearing judgment decision supreme court dhananjaya chandrachud cji)
ADVERTISEMENT
कलम 370 हटवण्याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. मोदी यांनी एक्स या सोशल माध्यमावर पोस्ट शेअर करून प्रतिक्रिया दिली. कलम 370 हटवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आजचा निर्णय ऐतिहासिक आहे. जो 5 ऑगस्ट 2019 रोजी संसदेत घेतलेल्या निर्णयावर घटनात्मक शिक्कामोर्तब करतो, असे मोदी यांनी म्हटले आहे. तसेच हे जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील आपल्या बंधू-भगिनींसाठी आशा, प्रगती आणि एकतेचा शक्तिशाली संदेश देते, असे देखील मोदी म्हणालेत.
हे ही वाचा : Uddhav Thackeray : ‘मुख्यमंत्र्यांनी स्वच्छतेची सुरुवात सहकाऱ्यांपासून करावी’, ठाकरेंचा सणसणीत टोला
आर्टिकल 370 हटाने को लेकर सुप्रीम कोर्ट का आज का निर्णय ऐतिहासिक है, जो 5 अगस्त, 2019 को संसद में लिए गए फैसले पर संवैधानिक मुहर लगाता है। इसमें जम्मू, कश्मीर और लद्दाख के हमारे भाई-बहनों के लिए उम्मीद, उन्नति और एकता का एक सशक्त संदेश है। माननीय कोर्ट के इस फैसले ने हमारी…
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2023
हे वाचलं का?
मी जम्मू, काश्मीर आणि लडाखमधील माझ्या कुटुंबातील सदस्यांना खात्री देऊ इच्छितो की, तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रत्येक प्रकारे वचनबद्ध आहोत. विकासाचे फायदे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावेत यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कलम 370 चा फटका बसलेली कोणतीही व्यक्ती यापासून वंचित राहू नये, असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.
हे ही वाचा : Kalyan Crime: तरुणासोबत लॉजवर गेलेल्या महिलेसोबत घडलं भयंकर, सापडला थेट..
सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय हा केवळ कायदेशीर दस्ताऐवज नसून तो एक मोठा आशेचा किरण आहे. त्यात उज्ज्वल भविष्याचे वचन आहे आणि अखंड भारत निर्माण करण्याचा सामूहिक संकल्प असल्याचे मोदी म्हणतात. तसेच या निर्णयामुळे आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचा मूळ विचार अधिक दृढ झाला आहे, जो प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे देखील मोदी म्हणतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT