NCP : शरद पवार गटाला मोठा धक्का, पक्षाच्या नवीन नावाबाबत प्रफुल पटेलांचा खळबळजनक दावा
27 फेब्रुवारीनंतर शरद पवार गटाला पुन्हा एकदा पक्षाच्या नवीन नावासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागणार असल्याची माहिती अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिली. त्यामुळे हा शरद पवार गटाला मोठा झटका आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
शरद पवार गटाला पुन्हा झटका
नवीन नावासाठी अर्ज करावा लागणार
नवीन नाव राज्यसभा निवडणुकीपूरतेच मर्यादीत
Praful Patel Reaction on Sharad Pawar Group Party Name : केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला. त्यानंतर बुधवारी 7 तारखेला निवडणूक आयोगाने शरद पवार (Sharad Pawar) गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' असं नाव दिले. परंतू हे नाव 27 फेब्रुवारीपर्यंत मर्यादित राहणार आहे. 27 फेब्रुवारीनंतर शरद पवार गटाला पुन्हा एकदा पक्षाच्या नवीन नावासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागणार असल्याची माहिती अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी दिली. त्यामुळे हा शरद पवार गटाला मोठा झटका आहे. त्यामुळे प्रफुल पटेल नेमकं काय म्हणाले आहेत? हे जाणून घेऊयात. (praful patel reaction on sharad pawar new party neme election commision ncp politival crises ajit pawar) group
ADVERTISEMENT
प्रफुल पटेल काय म्हणाले?
प्रफुल पटेल टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. यावेळी बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, 27 तारखेला पुन्हा (शरद पवार गटाला) नवीन पक्षाच्या नावासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करावा लागणार आहे. नवीन पक्ष आणि नवीन चिन्हासाठी त्यांना अर्ज करावा लागेल. शरद पवार गटाला आता जे पक्षाचे नाव देण्यात आले आहे ते राज्यसभा निवडणुकीपूरतेच मर्यादीत असणार आहे. त्यामुळे 27 तारखेनंतर त्यांना पक्षाच्या नावासाठी पुन्हा अर्ज करावे लागणार आहे, असे पटेल म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
शरद पवार गटाच्या पक्षाचं नावं काय?
दरम्यान निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह दिले होते. यानंतर शरद पवार गटाने पक्षाच्या नवीन नावासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. त्यानुसार शरद पवार गटाकडून नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरद पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार, तिसरं नाव नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदराव पवार या तीन नावांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी एका नावाला निवडणूक आयोगाकडून मान्यता देण्यात आली असून 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी–शरदचंद्र पवार' म्हणजेच 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गट'असं नाव आता शरद पवार गटाला असणार आहे.
ADVERTISEMENT
हे चिन्ह मिळणार?
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाचा असल्याचा निर्णय देण्यात आल्यानंतर शरद पवार गटाकडून चहाचा कप हे ही चिन्हं घेतले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर चहाच्या कपाव्यतिरिक्त त्यांनी सूर्यफूल आणि उगवता सूर्य हे ही निवडणूक चिन्हं देण्याची मागणी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT