Prakash Ambedkar : “…मग मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही”,’इंडिया’ला मेसेज
Prakash Ambedkar India Alliance : इंडिया आघाडीतील पक्षांना जर नरेंद्र मोदींचा पराभव करायचं असेल, तर काय करावं लागेल, याबद्दल प्रकाश आंबेडकरांनी महत्त्वाचा राजकीय सल्ला दिला… त्याचवेळी त्यांनी मोदी पुन्हा आले, तर काय होईल, याबद्दलही सावध केलं.
ADVERTISEMENT

Prakash Ambedkar on India Alliance : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा इंडिया आघाडीला भाजपविरोधात एकत्र येण्याचं आवाहन केलं. पुन्हा मोदी आले, तर तुम्ही सगळे तिहार तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी नागपुरातील सभेत बोलताना इंडिया आघाडीतील पक्षांच्या नेत्यांना दिला. याच कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काय करावं लागेल, याबद्दल खास स्ट्रेटजीही सांगितली.
नागपुरमधील कार्यक्रमात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले,”उद्या काय घडेल, काय नाही? हे सांगता येत नाही. कोण म्हणतंय आम्ही 23 जागा लढू, कोण म्हणतंय आम्ही अमूक जागा लढणार… आम्ही त्यांना म्हणतोय की, पहिल्यांदा जागा सोडा… मोदीचं भूत जे बसलंय ते पहिल्यांदा उतरवा. पक्ष वाढवणं हे जागांवरून ठरतं. तुम्हाला पक्ष वाढवायचा की मोदी घालवायचा… याचा पहिल्यांदा निर्णय करा. मोदी घालवायचा असेल, तर दोन-चार जागा कमी आल्या तरी चालतील ही भूमिका असली पाहिजे. नाहीतर मला एवढ्याच जागा पाहिजे, मग मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही तिहार तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाही”, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी नागपुरातील सभेत दिला.
Prakash Ambedkar News : इंडिया आघाडीला आवाहन आणि इशारा
“आज मी इंडियात असणाऱ्या नेत्यांना म्हणतोय की, आज असे अनेक प्रश्न आहेत जे आपण उपस्थित करू शकतो. या 56 इंच छातीमध्ये गाठ्या आणि फाफडा एवढेच आहेत, बाकी काहीच नाही. परंतु तुम्ही एकत्र आलात, आमचा भेजा आम्ही तुम्हाला देतो ना”, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीतील नेत्यांना दिला.
हेही वाचा >> पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार की नाही? अखेर फडणवीसांनी दिले उत्तर
“90 साली मुंबईत बॉम्बस्फोट झाले. कुणी केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता पुन्हा दाऊदचं नाव घेऊन बातम्या येताहेत. मी ‘इंडिया’वाल्यांना म्हणालो, जशा काही तुमच्या चुकलेल्या आहेत, तशा काही गोष्टी नागपूरकरांच्याही चुकलेल्या आहेत. त्यांनी बोट ठेवलं की तुम्ही बोटं ठेवायला शिका. घाबरता कशासाठी? मी असं मानतो की, हा जो संघर्ष आहे, या संघर्षात आपण जिंकलो तर पुन्हा 500-1000 वर्ष ही व्यवस्था चालत राहील, हे लक्षात घ्या”, असे प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीला म्हणाले.