Maratha Reservation : “मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही...”, प्रसाद लाडांचा जरांगेंना मोठा प्रस्ताव
Prasad Lad Manoj Jarange: भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर मनोज जरांगे पाटलांनी टीका केली होती. त्यानंतर प्रसाद लाड यांनी जरांगेंसमोर नवा प्रस्ताव ठेवला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

प्रसाद लाड यांचे मोठे राजकीय विधान

मनोज जरांगे पाटील यांना उत्तर देताना काय केली विनंती?

प्रसाद लाड मनोज जरांगे पाटील यांना काय म्हणाले?
Prasad Lad on Manoj Jarange: “मी स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे”, असे सांगत भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंना मोठा राजकीय प्रस्ताव दिला आहे. मनोज जरांगेंनी टीका केल्यानंतर आज प्रसाद लाड यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य करत मनोज जरांगे यांना एक विनंतीही केली आहे. (Prasad Lad appealed to Manoj Jarange that I resign from MLA and get you elected.)
प्रसाद लाड मनोज जरांगेंना काय म्हणाले?
मनोज जरांगे यांना आवाहन करताना आमदार लाड म्हणाले, “मनोज भाऊ, तुमची मुलाखत बघितली. तुम्ही मला भाऊ आणि दादा म्हणालात, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. मी म्हटलंच होतं की, तुम्ही कितीही वाईट शिव्या दिल्या, तरी मी तुम्हाला शिव्या देणार नाही. तुमची तक्रार करणार नाही कारण तुम्ही माझे भाऊ आहात. आज तुम्ही मला भाऊ म्हटलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद.”
हेही वाचा >> ''अजित पवार महायुतीतुन बाहेर पडले, तरच...'', आंबेडकरांचं मोठं राजकीय विधान
“आपण अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलात. उपोषणाचा मुद्दा अतिशय चांगला आहे, मराठा आरक्षण. आम्हीही तुमच्याबरोबर आहोत. पण, भाऊ मला वाटतं की, कुठेतरी आपला उपोषणाचा मुद्दा भरकटतोय. सरकारने ज्या योजना आणल्या... मग त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, लाडका भाऊ योजना असेल... आपण त्यावर थोडीशी टीका केली. मला वाटतं की, सरकारी योजना, सरकारी राजकारणात आपण पडू नये. ही आपली पहिल्यापासून इच्छा होती.”
मनोज जरांगेना प्रसाद लाड यांनी केली विनंती
“तुम्ही टीका केली म्हणून मी आपल्यावर टीका करत नाही. लहान भाऊ म्हणून छोटसं मार्गदर्शन करतो. आपल्याला योग्य वाटलं तर आपण ते स्विकारावं ही माझी आपल्याला विनंती आहे. भाऊ, आपण म्हणालात की, ही योजना चुकीची आहे. मला वाटतं की, जवळजवळ तीन कोटी महिला भगिनी, मातांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.”