Video : भारत जोडो यात्रेत ‘मोदी-मोदी’च्या घोषणा, राहुल गांधींच्या कृतीची का होतेय चर्चा?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

rahul gandhi flying kiss video bharat jodo yatra crowd slogan modi modi asaam video viral
rahul gandhi flying kiss video bharat jodo yatra crowd slogan modi modi asaam video viral
social share
google news

Rahul Gandhi Flying Kiss Video : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा काढली जात आहे. ही यात्रा सध्या आसाममधून पुढे सरकते आहे. यावेळी सोनितपूर जिल्ह्यात भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyay Yatra) गर्दीत मोदी-मोदीच्या घोषणा देत भाजपचे झेंडे फडकावल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे यात्रेत एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात राहुल गांधी या आंदोलनकर्त्यांना फ्लाईंग किस देताना दिसले आहेत. या संबंधित व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (rahul gandhi flying kiss video bharat jodo yatra crowd slogan modi modi assam video viral)

राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेची बस फिरते आहे. या बससोबत एक मोठी गर्दी चालते आहे. या दरम्यान अचानक काही भाजपचे कार्यकर्ते या भारत जोडो न्याय यात्रेत घुसतात आणि भाजपचे झेंडे फडकावून मोदी-मोदीच्या घोषणा देतात.

हे ही वाचा : Ram Mandir : 22 जानेवारीच्या सुट्टीबद्दल उच्च न्यायालयाने दिला निकाल, कोर्टात काय झालं?

भाजपच्या कार्यकर्त्यांच्या या घोषणा सुरु असताना राहुल गांधी हे त्यांच्या बसमध्ये बसलेले असतात. भाजपच्या कार्यकर्त्यांच्या या घोषणा पाहून बंदोबस्तात असलेली पोलीस कार्यकर्त्यांना बसपासून दुर करण्याचा प्रयत्न करते. हे पाहुन राहुल गांधी पोलिसांना रोखण्याचा प्रयत्न करतात. आणि बसमधून खाली उतरून ते भाजप कार्यकर्त्यांच्या दिशेने जातात. मात्र या दरम्यान कार्यकर्त्यांशी काय बोलतात हे व्हिडिओत दाखवले नाही आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मात्र व्हिडिओच्या शेवटी राहुल गांधी या भाजपच्या कार्यकर्त्यांना फ्लाइंग किस करताना दिसले आहेत. या संबंधित व्हिडिओ राहुल गांधी यांनीच शेअर केला आहे. आणि या व्हिडिओच्या कॅप्शनला लिहतात, सर्वांसाठी खुली आहे, मोहब्बत की दुकान, जुडेगा भारत आणि जितेगा हिंदुस्तान असे लिहले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Devendra Fadnavis : राऊतांचे नाव घेताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी मुर्खांना…’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT