Shiv Sena: ‘गुजरात लॉबीचं स्वप्न.. नार्वेकरांनी खंजीर खुपसला..’, निकालानंतर संजय राऊतांच्या संतापाचा कडेलोट

रोहित गोळे

Sanjay Raut: आमदार अपात्रता याचिकेवर राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना प्रचंड टीका केली आहे.

ADVERTISEMENT

rahul narwekar stabbed maharashtra in the back sanjay raut angry reaction after shiv sena mla disqualification verdict
rahul narwekar stabbed maharashtra in the back sanjay raut angry reaction after shiv sena mla disqualification verdict
social share
google news

Sanjay Raut vs Rahul Narwekar: मुंबई: आमदार अपात्रता याचिकेवर (MLA Disqualification) निर्णय देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी शिवसेना (ShivSena) ही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच असल्याचा निकाल दिला. तसंच शिंदेंनी नेमलेले व्हीप भरत गोगावले यांची नियुक्ती देखील योग्य असल्याचं म्हटलं. याच निकालानंतर शिवसेना (UBT) चे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राहुल नार्वेकर यांच्यावर प्रचंड आगपाखड केली. (rahul narwekar stabbed maharashtra in the back sanjay raut angry reaction after shiv sena mla disqualification verdict)

‘राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भाजपचं एक स्वप्न होतं की, बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीतून उखडून फेकू हे गुजरात लॉबीचं स्वप्न हे घटनात्मक पदावर बसलेल्या एका मराठी व्यक्तीने केलं.’ असं म्हणत संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर तुफान टीका केली.

संजय राऊतांच्या संतापाचा कडलोट… वाचा राऊत काय म्हणाले ते जसंच्या तसं!

‘नार्वेकरांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला’

‘जी दिल्लीवरून ‘ऑर्डर’ मिळाली आहे.. ती ‘ऑर्डर’ इथे दिली आहे. संविधान, कायदा, नियम.. सत्य काय आहे याबाबत निकाल नाही.. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना.. जिची 60 वर्षांपूर्वी स्थापना झाली होती. त्यावेळी आज जे शिवसेनेचे मालक आहेत मिस्टर शिंदे.. त्यांचं वय काय होतं? त्यांचा जन्म तरी झाला होता का? आज ते शिवसेनेचे मालक आणि बाळसाहेब ठाकरेंची शिवसेना इतिहासजमा झाली. भाजपचं हे मोठं षडयंत्र आहे.. एक मोठं स्वप्न होतं की, एके दिवशी आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवून टाकू.. पण शिवसेना अशी संपणार नाही.. तुमच्या एका निर्णयाने..’

हे ही वाचा>> Big Breaking: ‘Shiv Sena ही शिंदेंचीच, व्हीपही..’, नार्वेकरांनी दिला ठाकरेंची झोप उडवणारा निकाल

‘शिवसेना जनतेत आहे.. महाराष्ट्राच्या नसानसात आहे.. जो आजचा निर्णय आहे तो निकाल नाही, न्याय नाही.. ते एक षडयंत्र आहे.. आम्ही सुप्रीम कोर्टात नक्की जाऊ.. हे जे कोणी विधानसभेचे अध्यक्ष आहेत ज्यांना लवादाचा अधिकार दिला होता त्यांना एक मोठा इतिहास लिहिण्याची संधी मिळाली होती. संविधानाच्या आधारावर निर्णय देण्याचा आणि इतिहास निर्माण करण्याची संधी मिळाली होती. पण ती संधी त्यांनी दवडली..’

हे वाचलं का?

    follow whatsapp