Manoj Jarange : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेवर जरांगे म्हणाले, ‘तो दिवस आज…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

ram mandir inauguration pm narendra modi manoj jarange patil reaction maratha reservation
ram mandir inauguration pm narendra modi manoj jarange patil reaction maratha reservation
social share
google news

Manoj jarage Patil Reaction on Ram Mandir Inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांच्या हस्ते आज 22 जानेवारीला अयोध्येतील राममंदिरात रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. हा सोहळा संपूर्ण देशाने आनंदात साजरा केला. त्यात मराठा आरक्षणासाठी अंतरावली सराटी ते मुंबई अशा पदयात्रेवर असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी (Manoj jarage Patil) देखील यावर आनंद व्यक्त केला. “आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे”. ”भाजप असो की काँग्रेस असो… मी काही बघणार नाही”. ”राम भारतवासी आहे, आणि सगळ्या जनतेचा आहे”. ”भारतवासीयांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. खूप दशकांनंतर ही प्रतिक्षा आता संपल्याचे जरांगे पाटलांनी यावेळी सांगितले. (ram mandir inauguration pm narendra modi manoj jarange patil reaction maratha reservation)

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीहून पदयात्रा काढली आहे. मनोज जरांगे पाटील मुंबईला येत असून, ते मुंबईत उपोषण करणार आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या पदयात्रेचा 22 जानेवारी तिसरा दिवस असून, ते अहमदनगर जिल्ह्यात होते.

हे ही वाचा : Mla Disqualification : सुप्रीम कोर्टाची शिंदे गटाला नोटीस; कोर्टात काय झालं?

“आज प्रचंड आनंदाचा दिवस आहे. तो दिवस आम्ही साजरा करतोय. भाजप असो की काँग्रेस असो… मी काही बघणार. राम भारतवासी आहे आणि सगळ्या जनतेचा. भारतवासीयांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. खूप दशकांनंतर ही प्रतिक्षा आता संपली. त्यामुळे जो आनंदाचा दिवस उगवायचा होता, तो आज उगवला. संपूर्ण भारतवासी मोठ्या आनंदात आणि उत्साहात हा दिवस साजरा करताहेत, कारण राम हे हिंदू धर्माचा गर्व आहेत, स्वाभिमान आहेत. भगवान श्रीराम अयोध्येत विराजमान झाले आहेत, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सुरू असताना जरांगे कुठे होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी मनोज जरांगे पाटील हे अहमदनगर जिल्ह्यातील भिंगारे गावात पोहोचले होते. या गावातील राम मंदिरात जाऊन जरांगे पाटलांनी प्रभू रामाचे दर्शन घेतले. मनोज जरांगे पाटील यांनी प्रभू रामांची आरती केली. मनोज जरांगे हे मंदिरात येणार म्हणून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा : Govind Giri Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास सांगणारे गोविंदगिरी महाराज कोण?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT