Ramdas Kadam : 'शिवसेनेचे खासदार न येता फक्त भाजपचेच आले पाहिजे', कदम संतापले
Ramdas kadam on Shiv Sena BJP lok sabha seats sharing : शिवसेनेला जागा द्यायच्या नाही आणि आपले जास्तीत जास्त खासदार निवडून आणायचे आहेत, असा संशय येतोय, असे विधान रामदास कदम यांनी केले आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

रामदास कदम भाजपवर संतापले

शिवसेनेच्या जागांवर भाजपचा दावा

रामदास कदम काय काय बोलले?
Ramdas kadam BJP : आमची हक्काची जागा असताना ती तुम्ही नारायण राणेंना कशी देऊ शकता? नारायण राणे ती जागा कशी मागू शकतात? असे सवाल करत शिवसेना नेते रामदास कदम यांनी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांवर संताप व्यक्त केला. लोकसभा जागावाटपाच्या आधी भाजपकडून शिवसेनेच्या वाट्याला असलेल्या काही मतदारसंघावरच दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेनेत धुसफूस वाढली असून, कदम यांनी मुंबई तक ला दिलेल्या मुलाखतीत ही खदखद बोलून दाखवली. (How can bjp claims on Shiv sena lok sabha seats, asked ramdas kadam)
भाजपने तीन लोकसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. त्यावरून तुम्ही थेट भाजपवर टीका केली. तुमची नेमकी भूमिका काय आहे?
या प्रश्नाला उत्तर देताना रामदास कदम म्हणाले, "मी भाजपवर टीका केलेली नाही. मात्र एक गोष्ट निश्चितपणे आहे की, महाराष्ट्रातील जी मंडळी आहे. गोव्यातून जी मंडळी येतायेत, त्यांचं कसं चाललं आहे... विद्ममान खासदार असतानाही त्याला बाजूला ठेवून तिथे भाजपचा उमेदवार कसा देता येईल?"
"आता उदाहरण द्यायचंच झालं तर रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे विद्ममान खासदार आहेत. मोदीजी आणि शाह यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजपसोबत आलेले आहेत. असं असताना भाजपचे धैर्यशील पाटील... मग हा विश्वासघात होतो ना. विद्ममान खासदाराला बाजूला ठेवून...", असं कदम म्हणाले.