Sambhaji Bhide: ‘संभाजी भिडे अफजल खानाचे वंशज’, कुणी केली टीका?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sambhaji bhide controversial statement congress yashomati thakur criticize
sambhaji bhide controversial statement congress yashomati thakur criticize
social share
google news

sambhaji bhide controversial statement : शिव प्रतिष्ठाणचे संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्या विरोधात गरळ ओकली होती. यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली. अनेक नेत्यांनी संभाजी भिडेंवर (Sambhaji Bhide) कारवाईसाठी आंदोलनाचे हत्य़ारही उपसले आहे. तसेच कॉग्रेस नेत्याकडून संभाजी भिडेंवर सडकून टीका केली जात आहे. त्यात आता संभाजी भिडे अफजल खानाचे वकील भास्कर कुलकर्णी यांचे वंशज असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केला आहे. (sambhaji bhide controversial statement congress yashomati thakur criticize)

ADVERTISEMENT

स्थानिक लोक सांगतात की, संभाजी भिडे अफजल खानाचे वकिल कृष्णाजी भास्कर यांचे वंशज आहेत. म्हणजे हे वंशज कोणाचे, नाव काय ठेवतात, बोलतात काय. दुसरीकडे सरकार त्यांना खुलेपणाणे फिरू देत आहे, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी सरकारवर केली आहे. तसेच देशाच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे असंच करत राहिले आणि समाजात अशांतता पसरवली. 15 ऑगस्टच्या काळात काही अनर्थ झाला, तर त्याला जबाबदार गृहखातं पोलीस आणि नालायक संभाजी भिडे असेल, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या.

हे ही वाचा : India alliance : शरद पवारांबद्दल विरोधी पक्ष का आहेत टेन्शनमध्ये?

राष्ट्रपित्याविषयी अपशब्द आम्ही सहन करू शकत नाही हा फक्त राष्ट्रपित्याचा अपमान नाही तर या देशासाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक शहिदाचा अपमान आहे. ज्या राष्ट्रपित्याने आपले सर्वस्व या देशासाठी अर्पण केले त्यांच्याबद्दल कोणीही उपरा असे वक्तव्य करत असेल तर पुढे याचे परिणाम गंभीर होईल याची दखल शासनाने घ्यावी, असे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या. तसेच संभाजी भिडेवर सगळीकडे गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

“संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी काही संबंध नाही. ते त्यांचे स्वतःची संघटना चालवतात, याला जाणीवपूर्व राजकीय रंग देण्याचे काही कारण नाही याचा निषेध करत काँग्रेसचे लोक रस्त्यावर उतरतात तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय गलिच्छ ज्यावेळेस राहुल गांधी बोलतात त्यावेळी त्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे पण ते करत नाही. कुठल्याही परिस्थितीत महात्मा गांधींचा अपमान सहन केला जाणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस या प्रकरणावर बोलताना म्हणाले आहेत. तसेच “या संदर्भात जी उचित कारवाई करायची आहे, ती राज्य सरकार करेल. महात्मा गांधी असो, स्वातंत्र्यवीर सावरकर असो… कुणाच्याही विरुद्ध बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही”, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली.

हे ही वाचा : Loksabha सर्व्हे: महाराष्ट्राने शिंदे-अजित पवारांना नाकारलं, NDA ला मिळणार फक्त…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT