Shiv Sena : आधी श्रीकांत शिंदे, आता एकनाथ शिंदेंचा फोटो; संजय राऊतांनी बापलेकाला घेरलं

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sanjay raut criticize cm eknath shinde and shrikant shinde photo tweet vijay wadettiwar share reels maharashtra politics
sanjay raut criticize cm eknath shinde and shrikant shinde photo tweet vijay wadettiwar share reels maharashtra politics
social share
google news

Sanjay Raut criticize CM Eknath Shinde : भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणानंतर राजकारणातील गुन्हेगारी चर्चेत आली आहे. त्यात आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पुण्यातील गुंड निलेश घायवळचा मुख्यमंत्री शिंदेंसोबतचा फोटो व्हायरल केला होता. त्याआधी सोमवारी राऊतांनी श्रीकांत शिंदे यांची वाढदिवशी कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने भेट घेतल्याचा फोटो शेअर केला होता. या फोटोंच्या माध्यमातून महाराष्ट्रात गुंडाराज सूरू असल्याचा आरोप करत मुख्यमंत्री शिंदे आणि श्रीकांत शिंदेंना (Shrikant Shinde) घेरण्याचा प्रयत्न केला आहे. (sanjay raut criticize cm eknath shinde and shrikant shinde photo tweet vijay wadettiwar share reels maharashtra politics)

संजय राऊतांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो समोर आणला. या फोटोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील गुंड निलेश घायवळ सोबत फोटोत दिसले आहे. हा फोटो शेअर करून राऊतांनी ‘महाराष्ट्रात गुंडा राज सूरू आहे. हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा, असे चँलेज दिले होते. तसेच कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि विद्येचे माहेरघर होते. पण मोदी-शहा यांच्या राज्यकर्त्या टोळीने आज काय अवस्था करून ठेवली आहे, असा हल्ला राऊतांनी केला होता.

हे ही वाचा : PM Modi : नेहरू भारतीयांना खरंच आळशी म्हणाले होते का? 1959 मधील ‘त्या’ भाषणात काय?


याआधी सोमवारी राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांची कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने वाढदिवशी भेट घेतल्याचा फोटो व्हायरल केला होता. सरकारच्या बाळराजेचा वाढदिवस साजरा झाला. बाळराजांचे अभिष्टचिंतन करणारी ही वर्तुळातील व्यक्ती कोण याचा शोध घ्या? मग राज्यातील गुंडशाही कोण पोसत आहे ते कळेल?, असा सवाल राऊतांनी शिंदे सरकारला केला होता. पोलिस स्टेशनमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार गोळीबार करतात! महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे. गुंड सरकारी आशीर्वादाने मोकाट आहेत, या परिस्थितीस जबाबदार कोण? असा सवाल करत राऊत यांनी शिंदे सरकारला घेरले होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Manoj Jarange Patil : ‘राहुल गांधींना शुभेच्छा’, जरांगे ‘त्या’ विधानावर काय बोलले?

मंत्रालयात गुंडांची रिल्स

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लँटफॉर्मवर पुण्यातील गुंड निलेश घायवळची रिल्स शेअर केली आहे. या रिल्सच्या माध्यमातून वडेट्टीवार यांनी सरकारवर चौफेर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

एकीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्वसामान्य माणसाला रांगेत उभे राहावे लागते, तर दुसरीकडे सरकारने गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली आहे. त्यामुळे गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले केल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे आणि उप मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांचे अभिनंदन असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.

ADVERTISEMENT

पेपरफुटी विरोधात तरूण-तरूणी रस्त्यावर उतरतायत, नागपुरात आदिवासी बांधवांचे आंदोलन सुरू आहे. पण इकडे सरकारने गुंडांना रिल्स बनवण्यासाठी मंत्रालय खुले करून दिले आहे. त्यामुळे हीच का ती “मोदी की गॅरंटी” ? असा सवाल करत वडेट्टीवार यांनी सरकारला केला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT