NCP: 'चुलीत घाला तो निकाल तुमचा..', संजय राऊत चिडले; राहुल नार्वेकरांना भडाभडा बोलले!

मुंबई तक

Sanjay Raut vs Rahul Narvekar: राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष बहुमताच्या आधारावर अजित पवार यांच्याच आहे. असा निर्णय दिल्यानंतर संजय राऊत यांनी राहुल नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे.

ADVERTISEMENT

संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका
संजय राऊतांची राहुल नार्वेकरांवर टीका
social share
google news

बातम्या हायलाइट

point

संजय राऊत नार्वेकरांवर संतापले

point

संजय राऊतांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालावर टीका

point

राहुल नार्वेकरांना राऊतांनी सुनावलं.

Sanjay Raut vs Rahul Narvekar NCP: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष बहुमताच्या आधारावर अजित पवार यांच्याच आहे. असा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला. त्यांच्या याच निर्णयानंतर शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. 'चुलीत घाला तो निकाल तुमचा..' अशी अत्यंत उद्विग्न प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. (sanjay raut gets angry after giving decision that ncp party belongs to ajit pawar strongly criticizes rahul narvekar)

संजय राऊत संतापले, वाचा त्यांचा प्रतिक्रिया जशीच्या तशी...

'या शतकातला सगळ्यात किरकोळ निर्णय आहे हा.. किरकोळ..  याला ना ऐतिहासिक महत्त्व आहे ना यामध्ये काय यात अभ्यास आहे. म्हणजे समोर दिसतंय की, खून केला आहे.. खून होतोय लोकशाहीचा खून होतोय.. एका पक्षाचा खून होतोय आणि न्यायसनावर बसलेली व्यक्ती त्याला निर्दोष सोडतंय.. याला काय निकाल म्हणतात काय? चुलीत घाला तो निकाल तुमचा..' 

'विधानसभा अध्यक्ष काय रामशास्त्री आहेत का? ते दामशास्त्री आहेत. बघा.. अपात्र कसे करतील ते? शिवसेना आमदारांना त्यांनी अपात्र केलं नाही.. मुळात हा निकालच नाहीए.. हा वरून एक निकालाचा कागद आलाए.. तो फक्त त्यांनी वाचून दाखवला.' 

'कायदेशीर प्रक्रिया सर्वच पक्षांना करावा लागतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मूळ शरद पवारांचाच.. नार्वेकर काहीही बोलू द्या. त्यांनी काही सांगू द्या.. जसं आज इलेक्ट्रॉल बाँडबाबत निकाल दिला.. भाजपच्या तिजोरीत कसा काळा पैसा येतोय. तसा हा जो काळा निर्णय आहे.. शिवसेना, राष्ट्रवादीच्या बाबतीत.. हा काळ निर्णय आहे. तो दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टात जावं लागेल.' 

हे वाचलं का?

    follow whatsapp