Sanjay Raut: "जोपर्यंत दिल्लीच्या दोन्ही मालकांची...", निवडणुकीच्या तारखेवरून राऊतांनी मोदी-शहांना घेरलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Sanjay Raut vs PM Narendra Modi
Sanjay Raut vs PM Narendra Modi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार?

point

संजय राऊत यांनी मोदी-शहांवर केली घणाघाती टीका

point

संजय राऊत पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut Press Conference : वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंंत्री अमित शहा यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. वन नेशन वन इलेक्शनवर बोलताना राऊत म्हणाले, हे सर्व भाजप आणि मोदी सरकारचं ढोंग आहे. ते 4 राज्यांच्या निवडणुका एकत्रित घेऊ शकत नाहीत.14 महानगरपालिकेच्या निवडणुका एकत्रित घेऊ शकत नाहीत. मग हे देशात एकत्रित निवडणुका घेऊ शकतात का? हा सर्व एक ड्रामा आहे. 

नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, यावर बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्रात निवडणुका कधी होतील, हे शिंदे ठरवू शकत नाहीत. त्यांना नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याची माहिती दिल्लीच्या मालकाने दिलीय का? जोपर्यंत दिल्लीचे दोन्ही मालकांची इच्छा होत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोग महाराष्ट्रात निवडणुका घेणार नाही, असं म्हणत संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींसह अमित शहांवर निशाणा साधला. (Shiv Sena MP Sanjay Raut on Saturday Criticises Prime Minister Narendra Modi and Union Home Minister Amit Shah over the one nation one election issue)

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: ...तरच खात्यात जमा होतील 4500 रुपये! महिलांनो, 'हे' काम आताच करा

लाडकी बहीण योजनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमध्ये मोठं विधान केलं होतं. परंतु, मोदींच्या या विधानाचा राऊतांनी समाचार घेतला आहे. राऊत म्हणाले, "ही पंतप्रधानांची बुद्धी आहे? सडलेली बुद्धी आहे. मला प्रधानमंत्रीपदाचा अपमान करायचा नाही. पण पीएम मोदी ज्याप्रकारे बोलत आहेत, ते त्यांना शोभतं का? एकीकडे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेचं कौतुक करत आहेत. तर झारखंडमध्ये महाराष्ट्रापेक्षा चांगली लाडकी बहीण योजना आहे. कारण तिथे भाजपचं सरकार नाही. हा प्रधानमंत्र्यांचा नाही एखाद्या भाजप नेत्याचा सडलेला मेंदू आहे. प्रधानमंत्र्यांचा अपमान करायचा नाहीत." 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका घेतल्या जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते, यावर बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्रात निवडणुका कधी होतील, हे शिंदे ठरवू शकत नाहीत. त्यांना नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याची माहिती दिल्लीच्या मालकाने दिलीय का? जोपर्यंत दिल्लीचे दोन्ही मालकांची इच्छा होत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोग महाराष्ट्रात निवडणुका घेणार नाही.

हे ही वाचा >> Gold Rate : बाईईई! काय तो सोन्याचा भाव! स्वस्त झालं की महाग? 24 कॅरेटच्या किंमतीत झाले मोठे बदल

जर शिंदे म्हणत असतील, नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील. तर आम्ही त्यांना सांगतो, तुम्ही कधीही निवडणुका घ्या. आमचा विजय निश्चित आहे. लोकसभा निवडणुकीत यांची जी परिस्थिती झाली, तेच विधानसभा निवडणुकीत होणार आहे. त्यांच्या मनात भीती आहे. त्यामुळे निवडणुका उशिराने घेत आहेत. मुंबईतही महानगरपालिकेच्या निवडणुका घेत नाहीत. मुंबईतही आम्ही जिंकणार.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT