कोश्यारी अन् पाटलांवरील कारवाईचे शेपूट आत का घातले? भाजपच्या ‘त्या’ मागणीनंतर राऊत आक्रमक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : ‘नॅशनल हेराल्ड’च्या संपादिका सुजाता आनंद यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला अन् त्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी भाजपच्यावतीने केली जात आहे. पण त्याचवेळी भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावरील कारवाईचं काय? असा सवाल शिवसेना (UBT) चे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून विचारण्यात आला आहे. (Sanjay Raut’s criticism of Chandrakant Patil and Bhagatsinh Koshyari from the Samanaa editorial)

काय म्हटलं आहे सामना अग्रलेखात?

पंतप्रधान मोदींवरील टीका ही देशावरील टीका मानून तात्काळ कारवाई केली जाते, पण इतर श्रद्धास्थानांबाबत मात्र भाजपची अळीमिळी गुपचिळी असते. शिवरायांचा अपमान कोणीही केला तरी त्यांना माफी नाही, याबाबत शंकाच नाही.पण भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर समारंभात छत्रपती शिवरायांचा अपमान करून महाराष्ट्राच्या तसंच हिंदूंच्या भावना दुखावल्या होत्या. तेव्हा सुजाता आनंदविरुद्ध कारवाईची मागणी करणारे गप्प होते. उलट कोश्यारींच्या बाबतीत त्यांचं समर्थन करण्याचीच बोटचेपी भूमिका याच मंडळींनी घेतली होती. यात स्वतःला शिवरायांचे वंश म्हणवणाऱ्यांनीही ‘स्वाभिमान’ म्हणून कडक भूमिका घेतली नाही.

मुंबई Tak बैठक: अजित पवार नॉट रिचेबल असताना कुठे होते?, फडणवीसांनी खरं काय ते सांगूनच टाकलं!

त्यावेळी भाजपने भगतसिंह कोश्यारींचा निषेध करावा, त्यांच्याविरोधात ठराव मंजूर करुन त्यांना तात्काळ, अशी विनंती केंद्राला करावी अशी राज्यातील जनतेची अपेक्षा होती. पण राज्यपालांना तसे म्हणायचे नव्हते. त्यांना असे सांगायचे होते आणि त्यांना तसे बोलायचे होते. त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला अशी फडतूस वकिली भाजपनेच त्यावेळी केली, यातचं त्यांचं ढोंग उघडं पडलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

भगतसिंह कोश्यारी यांना जाब विचारला असता तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सन्मान राखण्यात भाजप कसूर करत नाही हे आम्ही मान्य केले असते, पण तुमच्या राज्यपालांनी केलेला शिवरायांचा अपमान पचवायचा आणि इतरांनी केलेल्या अपमानावर शेपटी हलवून जाब विचारायचा याचा काय अर्थ घ्यावा? छत्रपती शिवराय हे एकच आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील श्रद्धांना असा छेद देता येणार नाही.

शरद पवारांच्या मनात काय? जयंत पाटलांनी सांगितली 2019 ची स्टोरी; म्हणाले,…

पुन्हा जे शिवरायांच्या बाबतीत तेच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत झाले. अगदी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात ‘बैठक’ झाली तरी तो म्हणे हिंदुत्व आणि शिवसेनाप्रमुखांचा अपमान ठरतो, पण ‘मिंधे’ सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाप्रमुखांचा अपमान करून जो ‘घोटाळा’ केला त्या अपमानावर एकही लाचार मिंधे तोंड उघडायला तयार नाही. आता ‘नॅशनल हेराल्ड’प्रकरणी कारवाई करा, अशी बोंब भाजपची मंडळी ठोकत आहेत. ‘नॅशनल हेराल्ड’ व त्यांच्या संपादिकेवर कारवाई करावी, पण भगतसिंह कोश्यारी व चंद्रकांत पाटील यांच्यावरील कारवाईचे काय? त्यांच्यावरील कारवाईचे शेपूट आत का घातले आहे?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT