रक्ताचं नातं असून साताऱ्याचे दोन्ही राजे सारखे का भिडतात? इतिहासातच आहे उत्तर!
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanaraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinghraje Bhosale) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. खरं तर हे दोघंही एकमेकांचे भाऊ आहेत. एवढंच नव्हे तर गेली अनेक वर्ष एकाच राजकीय पक्षातही आहेत.
ADVERTISEMENT

Udayanaraje and Shivendrasinghraje Bhosale’s Dispute : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanaraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinghraje Bhosale) यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. खरं तर हे दोघंही एकमेकांचे भाऊ आहेत. एवढंच नव्हे तर गेली अनेक वर्ष एकाच राजकीय पक्षातही आहेत. तरी त्यांच्यात आणि त्यांच्या समर्थकात नेहमीच वैर भावना पाहायला मिळते. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेसिंह भोसले यांच्यात सतत भांडणं होत असतात. बुधवारी 21 जून रोजी साताऱ्यात नूतन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भूमिपूजनावेळी ते दोघंही आमनेसामने आले. त्यांच्या समर्थकांमध्ये भूमिपूजनावरून राडा झाल्याने आता पुन्हा एकदा त्यांच्यातील असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे. (Satara Udayanaraje and Shivendrasinghraje Bhosale’s are brothers but What is the reason of dispute between them)
उदयनराजे भोसले यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1966 रोजी तर शिवेंद्रराजे भोसले यांचा जन्म 30 मार्च 1973 रोजी साताऱ्याच्या राजघराण्यात झाला. ते दोघे सख्खे चुलत भाऊ आहेत. उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आहेत. राजेशाही व्यक्तिमत्त्व असणारे उदयनराजे हे सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. 1990 मध्ये उच्चशिक्षण घेऊन लंडनमधून परतल्यानंतर त्यांनी राजकीय वर्चस्वासाठी राजकारणात उडी घेतली. आता सध्या ते भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. तर शिवेंद्रराजे हे भाजपचेच विधानसभेवर निवडून गेलेले आमदार आहेत.
पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीआधीच आप-काँग्रेसचं बिनसलं, काय टाकली अट?
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद वडिलोपार्जित!
उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद हा नवीन नाही तर जुनाच आहे. साताऱ्यातील दोन राजेंमधील या वादाचं कारण काय? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
उदयनराजे भोसले यांचे वडील प्रतापसिंहराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वडील अभयसिंहराजे भोसले हे सख्खे भाऊ होते. तर, उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे चुलत भाऊ आहेत. त्यावेळी काका अभयसिंहराजे काँग्रेस पक्षात होते. त्यांनी राजकारणात पुढचं पाऊल टाकत अनेक मोठ्या कामांची सुरूवात केली अन् सहकार चळवळीच्या माध्यमातून कारखाना, दोन बँका उभारल्या.