मुंबई TaK चावडी : शरद पवारांची अजित दादांशी भेट आणि भूमिका….,रोहित पवारांनी सांगितला मोठा फरक

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sharad pawar ajit pawar meet after ncp split rohit pawar tells meeting reason and pawar role mumbai tak chawadi
sharad pawar ajit pawar meet after ncp split rohit pawar tells meeting reason and pawar role mumbai tak chawadi
social share
google news

Rohit Pawar Mumbai Tak Chawadi: राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची तर 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या फुटीनंतर देखील शरद पवार (sharad Pawar) यांनी अजित पवार आमचेच नेते आहे, अशा आशयाचे विधान केले होते. या विधानानंतर महाविकास आघाडीत आणि जनतेत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र शरद पवारांच्या या भेटीमागचं आणि भूमिकेमागचं राजकारण राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुंबई TaK चावडीवर उलगडलं आहे.(sharad pawar ajit pawar meet after ncp split rohit pawar tells meeting reason and pawar role mumbai tak chawadi)

ADVERTISEMENT

शरद पवारांना कोणत्याही भाजपच्या नेत्याने भेटण्यास विचारलं तर ते लगेच होकार देतात. पण ते भूमिका बदलत नाही, यामागच कारण
उदाहरणासह रोहित पवार यांनी यावेळी दिले. शरद पवारांनी टिळक कुटुंबियांच्यावतीने टिळक पुरस्कारासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. या टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून शरद पवारांवर काँग्रेस, शिवसेनेने दबाव टाकला होता. ‘पवार साहेब जाऊ नका’. पण शरद पवारांनी भूमिका बदलली नाही, असे रोहित पवार यांनी सांगितले.

हे ही वाचा : INDIA PC: शरद पवारांनी टाकला भलताच डाव, PM मोदींना चॅलेंज अन् अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम?

यामागचं कारण सांगताना रोहित पवार म्हणाले की, नेते दुसऱ्या पक्षाचे असले तरी एकमेकांशी भेटत होते. त्यांचे विषय सोडवत होते. ही राजकारणातली परंपरा होती. पण शरद पवारांनी व्यासपीठावर जाऊन आम्ही या पिढीतले नेते आहोत, हे दाखवून दिले. आम्ही इतकं मोठं मन ठेवतो, खालच्या पातळीवर जात नाही. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करतो. आणि ज्या ठिकाणी समाजकारण येते, तिथे आम्ही आमची भूमिका स्पष्ट ठेवतो. हा मेसेज शरद पवारांनी व्यासपीठावरून दिल्याचे रोहित पवारांनी सांगितले.

हे वाचलं का?

आता अजित दादांशी बैठक का झाली? कशी झाली? हे आम्ही विचारत नाही. कारण आम्हाला भाजपसोबत जायचं नाही,भाजपबरोबर जे गेले त्यांच्यासोबत जायचं नाही, असे स्पष्ट सांगितले गेले आहे. त्यामुळे शरद पवारांनी जर स्पष्ट सांगितलं असेल, तर आम्ही विचारतही नाही आणि वेळही घालवत नाही. आणि आता आम्ही लढायचं ठरवलं आहे आणि लढतो आहे,असे रोहित पवारांनी स्पष्ट सांगितले.

हे ही वाचा : Sunil Raut : ‘आजही मला 100 कोटींची ऑफर, पण…’; सुनील राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट

दादांसोबत राजकियदृष्ट्या संघर्ष होणार

अजित दादांचा व्यक्तीगतरीत्या आदर असेलच, पण त्यांनी जी रााजकिय विचारसरणी निवडली आहे. ज्या विचासरणीबाबत ते गेले आहेत, तो विचार आवडत नाही.त्यामुळे राजकियदृष्टया संघर्ष होणार असे रोहित पवार यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच व्यक्तिगत पातळीवर नातं चांगलं राहिलं पाहिजे, अशी आशा देखील रोहित पवारांनी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी पक्ष हा एकच आहे, तो फुटला नाही आहे, याचा अर्थ असा की फक्त 9 लोक बाहेर पडून सत्तेत बसले आहेत. याप्रकरणी आम्ही कोर्टात लढतो आहे. तसेच निवडणूक आयोग यावर काय निर्णय देईल, हे एखादा टपरीवालाही सांगेल.त्यानंतर कोर्टात जायचं आहे. रणनीती कोर्टाच्या बाबतची आहे, असे देखील रोहित पवारांनी सांगितले. तसेच भाजपच्या विरोधात लढायचंय, जे भाजपच्या विचाराच्या जवळ गेले आहेत त्याच्याशी लढायचं असल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT