शरद पवारांचा मोदींवर निशाणा, पंतप्रधानांनी नेहरूंवर टीका करणं अयोग्य

ADVERTISEMENT

political
ncp leader
social share
google news

Sharad Pawar: पंतप्रधान हे कोणत्याही पक्षाचे नसतात, तर ते देशाचे असतात असा पलटवार करत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (pandit jawaharlal nehru) यांच्यावर केलेल्या टीकेमुळे दुःख झालं असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. कारण दिवंगत नेत्यावर असं बोलणं चुकीचं असल्याचंही मत त्यांनी व्यक्त केले. कारण शरद पवारांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचे देशातील इतिहासाचे योगदान असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले. 

नेहरूंचं मोठं योगदान

ब्रिटिशांविरधात लढत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि त्यासाठी जे जे करता येईल त्याच्यासाठी मोठं कष्ट जवाहरलाल नेहरू यांनी केले आहे. देशात आज जी काही विज्ञान आणि तंत्रज्ञांनाची प्रगती झाली आहे  ती प्रगती नेहरूंमुळे झाली आहे. कारण विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये त्यांनी लक्ष घातल्यामुळेच आपण प्रगती करू शकलो असंही त्यांनी यावेळी सांगितले.

नेहरूंंना नाकारू शकत नाही

देशाची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी नेहरूंनी केलेल्या प्रयत्नामुळे नेहरूंना आपण कोणत्याही गोष्टीतून बेदखल करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीका केलेल्या टीकेमुळे आपल्याला दुःख झाल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

लोकशाहीला शक्ती देण्याचं काम

भारतातील लोकशाहीला सुरुवात करण्याचं कार्य आणि लोकशाहीला शक्ती देण्याचं काम पंडित नेहरूंनी केले आहे. इंग्रजांच्या अधिपत्याखालून देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आपण कोणत्याही कारणाने आपण नाकारू शकत नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहरूंवर केलेली टीका ही योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT