राहुल गांधींना झालेली शिक्षा हेच अधोरेखित करतेय; न्यायालयाच्या निकालानंतर पवारांनी व्यक्त केली चिंता
Sharad Pawar on Rahul Gandhi sentenced in defamation case : सूरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना अब्रुनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा दिली. न्यायालयाच्या या निकालानंतर शरद पवारांनी चिंता व्यक्त केली.
ADVERTISEMENT
Surat Court Convicts Rahul Gandhi In Defamation Case: काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सूरत सत्र न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. या निर्णयामुळे राहुल गांधींची खासदारकीच धोक्यात येण्याची शक्यता असून, विरोधी पक्षाकडून तीव्र पडसाद उमटले आहेत. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्रावर निशाणा साधत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 2019 मध्ये कर्नाटकात प्रचारसभेदरम्यान केलेल्या एका विधानावरून न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला. सूरत सत्र न्यायालयात यावर सुनावणी झाल्यानंतर सत्र न्यायालयाने या प्रकरणात राहुल गांधींना दोषी ठरवलं.
“उपमुख्यमंत्री ‘होयबा’ अंध भक्त”, शिवसेनेनं (UBT) फडणवीसांवर डागली तोफ
राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली असून, त्यांची खासदारकीही जाण्याची चर्चा सुरू झालीये. राहुल गांधींना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली असून, देशभरात ठिकठिकाणी आंदोलन करत आहे.
हे वाचलं का?
राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा : शरद पवार काय म्हणाले?
राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर विरोधी पक्षानी यावरून सरकारला लक्ष्य केले आहे. शरद पवार यांनीही यावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Raj Thackeray : राज ठाकरेंनी निवडून आणलेले 13 आमदार सध्या आहेत कुठे?
शरद पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “देशात मूलभूत अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीतील अभिव्यक्तीचा संकोच करण्याचा प्रयत्न केला जात असून, मी गंभीर चिंता व्यक्त करतो. विरोधी पक्ष, नेते आणि भारतातील लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे, ही गंभीर बाब आहे. राहुल गांधी यांच्याबद्दलचा निकाल हाच मुद्दा अधोरेखित करत आहे. राष्ट्रवादीचे खासदार पीपी मोहम्मद फैजल यांचेही प्रकरण असेच आहे. राजकीय पटलावर सुरू झालेल्या नव्या पायंड्याबद्दल मला खेद वाटत आहे. आजच्या परिस्थितीत याची सर्वांनी गांभीर्याने दखल घ्यायला हवी,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
नरेंद्र मोदींनी खटला दाखल करायला हवा होता, संजय राऊतांची टीका
राहुल गांधींवरील कारवाईबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, “राहुल गांधी यांना ज्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा झालीये, ती नरेंद्र मोदी यांची बदनामी आहे, असं वाटत असेल, तर नरेंद्र मोदींनी खटला दाखल करायला हवा होता. चौथी पार्टी खटला दाखल करते आणि सूरतचे न्यायालय त्यावर निकाल देते. हा काय प्रकार आहे. कशाकरिता हे चाललंय सगळं? राहुल गांधींची लोकसभेतील खासदारकी रद्द करावी, यासाठी हा सगळा आटापिटा सुरू आहे. त्या भूमिकेतून सूरतचा निकाल दिला असावा, असं स्पष्ट आहे”, असं म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर टीका केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT