NCP : ‘…म्हणून शरद पवारांचा राजीनामा हवा होता’, जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक खुलासा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sharad pawar group leader jitendra awhad reply and question to ajit pawar ncp crisis maharashtra politics
sharad pawar group leader jitendra awhad reply and question to ajit pawar ncp crisis maharashtra politics
social share
google news

Jitendra Awhad Criticize Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज कर्जतमधील त्यांच्या दोन दिवसीय शिबिराच्या समारोपाच्या भाषणात शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार हल्ला चढवला. शरद पवार यांनीच राजीनामा मागे घेण्यासाठी कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यास भाग पाडल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. या सर्व आरोपांवर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया देऊन जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (sharad pawar group leader jitendra awhad reply and question to ajit pawar ncp crisis maharashtra politics)

जितेंद्र आव्हाड पत्रकार परिषदेत बोलत होते. ज्यांनी तुम्हाला घडवलं त्यांच्यावरच तुम्ही बोलता,बोलताना जरा मर्यादा बाळगा. साहेबांबद्दल बोलायला अजित पवार इतके मोठे नाहीत. तसेच अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर बोलाव हे कलयुग आहे, अशी टीका आव्हाड यांनी अजित पवारांवर केली. तसेच तुम्ही कितीही मोठे झालात तरी तुमचा निर्माता हा शरद पवारच हे अख्या जगाला माहिती आहेत. बापाची चप्पल पायात आली म्हणुन बाप होता येत नाही किंवा अक्कल वाढत नाही. शरद पवार यांचं पोट बाहेर आलं असेल तर तुम्ही कुठले बॉडी बिल्डर आहात, बालिश भाषण करता, असा टोलाही आव्हाडांनी अजित पवारांना लगावला.

हे ही वाचा : Reduce belly Fat : कंबरेवरचा घेर होईल झटपट कमी, दररोज करा ‘ही’ योगासने

खरं तर यांनाच (अजित पवार) पक्ष दावणीला लावायचा होता, दुसऱ्या पक्षात विलीन करायचा होता. पण शरद पवार त्यांना अडसर ठरत होते. म्हणून शरद पवार यांचा राजीनामा यांना हवा होता, असा खुलासा जितेंद्र आव्हाड यांनी केला. तसेच तुमचं प्लॅनिंग कधी पासुन होत हे स्वतः विचार करा, 5 वर्ष पवार साहेबांचं डोकं कोणी खाल्लं, भाजप सोबत चला हे कोण कोणाला सांगायचं याच चिंतन करा, असे आवाहन आव्हाडांनी अजित पवारांना दिले. शरद पवार यांचा राजकीय प्रवास धुलीत मिळवून आपण सत्तेत यायचं हे यांना हवं होत. तुम्ही शरद पवार यांना घाबरवायला जाता, बस करा हे बालिश राजकारण, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी नेमकी कुणाची यावर देखील जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात जर कोणालाही विचारलं तर कोणीही सांगेल, खरी राष्ट्रवादी शरद पवार यांचीच आहे. पहिली गोष्ट खरी आहे. पण राष्ट्रवादी कोणाची याचा निर्णय सुप्रीम कोर्टातून येणे बाकी आहे, असे आव्हाडांनी सांगितले.

हे ही वाचा : ‘दुसऱ्यांच्या घरात धुणीभांडी…’ ठाकरेंची Cm शिंदेंवर जोरदार टीका

    follow whatsapp

    ADVERTISEMENT