Sharad Pawar: भाजपला का भासली ‘पवार पॉलिटिक्स’ची गरज?, चक्रव्यूहात कोण अडकलं अजितदादा की पवार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

The entire credit for the split of NCP goes to Modi-Shah and Fadnavis. But now why does BJP need Pawar politics? Such questions are being raised.
The entire credit for the split of NCP goes to Modi-Shah and Fadnavis. But now why does BJP need Pawar politics? Such questions are being raised.
social share
google news

Maharashtra Latest Political News : महाराष्ट्रात शिवसेनेतील शिंदेंच्या बंडखोरीला वर्षपूर्ती झाली असतानाच आता भाजपने वर्षभऱानंतर शिवसेना पाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेस देखील फोडली आहे. रविवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबतच्या 9 आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेत, शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला. या घटनेने महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आणि राष्ट्रवादी कॉग्रेस फुटली. राष्ट्रवादीच्या फुटीचे संपूर्ण श्रेय मोदी-शाह आणि फडणवीसांना जाते. मात्र आता भाजपला पवार पॉलिटीक्सची गरज का पडली आहे? असा सवाल उपस्थित होत आहेत. त्यात आता राजकीय तज्ज्ञांनी भाजपच्या या खेळीमागची चार प्रमुख कारणे सांगितली आहेत. ही कारणे काय आहेत, हे जाणून घेऊयात. (sharad pawar ncp ajit pawar maharashtra politics bjp nda assembly elections)

भाजपच्या या पवार पॉलिटीक्सची मागच्या चार प्रमुख कारणांमधल राजकीय तज्ज्ञांनी सांगितलेले पहिले प्रमुख कारण म्हणजे,शिवसेनेच्या शिंदे गटाच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई झाल्यास सरकार अल्पमतात येईल, दुसरे कारण म्हणजे, देशातील विरोधी पक्षाच्या एकजूटीची हवा काढणे, तिसरे कारण म्हणजे, महाराष्ट्र आणि महापालिका निवडणूकीवर नजर आणि चौथे कारण म्हणजे शिंदेच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेला जनतेतून मिळत असलेली सहानुभूतीची लाट ओसरणे.

शिंदेंचे आमदार अपात्र ठरल्यास…

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली होती. या बंडखोरीत शिंदेंना आमदारांचा मोठा पाठींबा असल्याने उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर उद्धव ठाकरे यांनी शिंदेंसोबतच्या 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली होती. आमदारांचे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचताच, सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. यामध्ये शिंदेचे आमदार जर अपात्र ठरले तर अजित पवार आणि आमदारांच्या रूपाने भाजपसमोर एक बॅक प्लान असणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विरोधकांच्या एकजुटीला धक्का

देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणूका होणार आहेत. ही निवडणूक लक्षात घेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देशभरातील भाजप विरोधी पक्षाची मोट बांधायला सुरूवात केली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात विरोधकांच्या एकजुटीला जास्त बळ मिळत आहे. लोकसभेच्या जागांनुसार महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर दुसरे मोठे राज्य आहे. त्यात महाराष्ट्रात भाजपसमोर शिवसेना (UBT),राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांविरूद्ध निवडणूक लढवावी लागणार होती. हा धोका लक्षात घेऊन भाजपाने राष्ट्रवादी फोडल्याची चर्चा आहे. भाजपच्या या खेळीने लोकसभा निवडणूकीचा मार्ग मोकळा होणार आहे, यासोबतच विरोधकांच्या एकजुटीलाही धक्का बसणार आहे.

नितीश कुमार यांच्या नेतृत्वात पाटण्यात विरोधकांची एक बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर कर्नाटक किंवा बंगळुरूच दुसरी बैठक होणार होती. तत्पुर्वीच भाजपाने महाराष्ट्रात राष्ट्रवादीला फोडून विरोधकांची एकजूट थंड केली आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील निवडणूक आणि महापालिकेवर नजर

राष्ट्रवादीच्या या फुटीला महाराष्ट्रातील आगामी निवडणूका आणि मुंबई महापालिकेशी जोडले जात आहे. या घटनेवर जेष्ठ पत्रकार सांगतात की, शिवसेना फुटीनंतर महाविकास आघाडी आणखीण ताकदीने मैदानात उतरली आहे. तर शिंदे सरकार बनल्यानंतर पोटनिवडणूकीत एनड़ीएची कामगिरी चांगली राहिली नव्हती. अंधेरी पोटनिवडणूकीत तर एनडीएने उमेदवार देखील उतरवला नव्हता. तर पुण्याच्या कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपला बालेकिल्ला गमवावा लागला होता. आणि कॉंग्रेसने सत्ताधारी युतीला मात दिली होती. त्यामुळे एकीकडे शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंभोवती सहानुभूतीची लाट असताना, महाराष्ट्रातील आगामी निवडणूका आणि मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपने ही रणनिती रचल्याचे बोलले जात आहे.

ADVERTISEMENT

ठाकरेंविरूद्द मायक्रो प्लान

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंसाठी जनतेते सहानुभूती आहे. या सहानुभूतीचे आता एका लाटेत रूपांतर होत आहे. उद्धव ठाकरेंसाठीची ही लाट मोडून काढण्यासाठी आणि महाविकास आघाडी आणखीण खिळखिळी करण्यासाठी भाजपने राष्ट्रवादी फोडल्याचे जाणकार म्हणत आहेत. मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंसाठीची सहानुभूती आणि महाविकास आघाडी महापालिका निवडणूका लढवल्यास महापालिकेत पराभूत होण्याची भीती भाजपला होती. यासाठी देखील राष्ट्रवादी फोडल्याचे बोलले जात आहे.

शरद पवार राजकीय चक्रव्युहात अडकले?

अजित पवार यांनी 2019 ला घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीचा कल्पना मला होती, असा खुलासा शरद पवार यांनी नुकताच केला होता. मला फक्त भाजपा सत्तेसाठी किती टोकाला जाते, हे पाहायचे होते, म्हणून मी शपथविधी आधी पाठींबा मागे घेतल्याचा खुलासा त्यांनी केला होता. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपालमध्ये राष्ट्रवादीवर हल्लाबोल करत घोटाळ्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्यानंतर अजित पवारांनी शिंदे सरकारमध्ये सामील होणे हा शरद पवारांचा डबलगेम असल्याचेही बोलले जात आहे. त्याचसोबत अजित पवारांच्या शपथविधीनंतर शरद पवार यांनी पक्षाला पुन्हा उभं करण्याचे मोठं विधान केले होते. काही लोक म्हणतायत राष्ट्रवादी आमची आहे. आम्ही पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी लढाई लढणार नाही. जनतेला माहिती राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे. शऱद पवारांच्या या वक्तव्यामागे त्यांच्या डबलगेम दिसुन येत आहे, त्याचसोबत ते राजकीय चक्रव्युहात अडकल्याचेही बोलले जात आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT