Aaditya Thackeray लोकसभा निवडणूक लढवणार?, India Today Conclave मध्ये सांगितला प्लॅन

मुंबई तक

ADVERTISEMENT

shiv sena ubt leader aaditya thackeray will contest lok sabha elections he reveals plan in india today conclave mumbai
shiv sena ubt leader aaditya thackeray will contest lok sabha elections he reveals plan in india today conclave mumbai
social share
google news

Aaditya Thackeray Lok Sabha Election: राहुल कनवाल, मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या बरीच उलथापालथ सुरू आहे. अशातच 2024 च्या लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election 2024) देखील नजीक आल्या आहेत. अशावेळी मतदारसंघ, तिकिटं, युती-आघाडी याविषयी जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, या सगळ्यातच शिवसेना (UBT) नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी एक मोठं विधान केलं आहे. इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये (India Today Conclave) बोलताना आदित्य ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात यावरुन वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. (shiv sena ubt leader aaditya thackeray will contest lok sabha elections he reveals plan in india today conclave mumbai)

ADVERTISEMENT

2019 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे 2024 निवडणुकीत देखील शिवसेना (UBT) अधिकाधिक जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे. अशावेळी आदित्य ठाकरे यांच्यासारख्या नेत्याला देशाच्या राजकारणात उतरवून ठाकरे गट एक वेगळी खेळी खेळू शकतं. ज्याचे संकेत स्वत: आदित्य ठाकरे यांनीच आता दिले आहेत.

आदित्य ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यास त्याचा एक वेगळा परिणाम शिवसैनिकांवर होऊ शकतो. ज्याचा फटका हा शिंदे गटाला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच ठाकरे गट ही खेळी खेळण्याची अधिक शक्यता आहे आणि म्हणूनच आदित्य ठाकरेंनी देखील याबाबत कोणताही नकार दिलेला नाही.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> ‘…अन् एकनाथ शिंदे रडायला लागले’, आदित्य ठाकरेंनी कोणता किस्सा सांगितला?

लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे?

‘मी हे म्हणतो की, जे आपल्यासोबत आहेत तेच आपले आहेत त्यांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. इंडियामध्ये अनेक पक्ष असे आहेत की, आमच्याबाबत काही वेगळा विचार करायचे किंवा आम्ही त्यांच्याबाबत काही वेगळा विचार करायचो. पण देशासाठी, राज्यांसाठी ते एकत्र येत असतील तर त्यांना घेऊन पुढे जाऊ.’ असं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

तुम्ही तुमचं करिअर महाराष्ट्रातील राजकारणात पाहात आहात की, तुम्ही 2024 ला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहात? असा प्रश्न इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला.

ADVERTISEMENT

ज्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘मी दोन्ही गोष्टी पाहत आहे. मी इंडिया टुडे कॉनक्लेव्हला देखील आलोय आणि मुंबई Tak कॉनक्लेव्हला देखील गेलो होतो. मी प्लॅटफॉर्म दोन्ही पाहतोय ना…’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> NCP : शरद पवारांचा एक खासदार झाला कमी, ECI सुनावणी आधीच कोर्टात झटका!

तुम्ही 2024 लोकसभा निवडणूक लढवणार की, विधानसभा निवडणुकीची वाट पाहणार?

यावर आदित्य ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की, ‘मला पक्ष जी निवडणूक लढविण्यास सांगेल ती निवडणूक मी लढवेन. मला जी जबाबदारी मिळेल ती मी निभावण्यासाठी तयार असेन. पक्षाला प्रत्येक माणसाची गरज असते. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्ष जी जबाबदारी सोपवतो त्यासाठी तयार असतो.’ असं म्हणत आदित्य ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीबाबत मोठे संकेत दिले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT