Shiv Sena UBT: ‘त्या’ Video नंतर उद्धव ठाकरे प्रचंड संतापले, नार्वेकर-शिंदेंना म्हणाले; ‘तुम्ही…’
Uddhav Thackeray attack on Rahul Narwekar: उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राहुल नार्वेकरांवर तुफान टीका केली. यावेळी ठाकरेंनी या दोन्ही नेत्यांना आव्हानही दिलं.
ADVERTISEMENT
Uddhav Thackeray: Shiv Sena UBT चे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (16 जानेवारी) महापत्रकार परिषद घेत.. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालाची चिरफाड केली. यावेळी 2018 साली झालेल्या शिवसेनेच्या अंतर्गत निवडणूक प्रक्रिया याचे व्हीडिओ आणि कागदपत्रं सादर केली. यानंतर उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणात राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. तसंच या दोघांनाही ठाकरेंनी एक खुलं आव्हानही यावेळी दिलं. (shiv sena ubt press confernce my open challenge eknath shinde and rahul narwekar come without security said uddhav thackeray)
ADVERTISEMENT
‘राहुल नार्वेकर आणि मिंध्यांनी माझ्याबरोबर उभं रहावं.. तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची. पोलीस संरक्षण न घेता या.. मी पण एकटा येतो.. मग कुणाला पुरावा, गाडावा आणि तुडवावा हे जनताच ठरवेल.’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर आणि शिंदेंना खुलं आव्हान दिलं.
हे ही वाचा>> Uddhav : ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’, पत्रकार परिषदेत काय केला महाखुलासा?
यापुढे ते असंही म्हणाले की, ‘व्हीप तुमचा वगैरे आम्हाला लागू होणार नाही. व्हीपचा मराठी अर्थ चाबूक. चाबूक शिवसैनिकांच्या हातात शोभून दिसतो लाचारांच्या हातात नाही.’ अशी बोचरी टीका देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे.
हे वाचलं का?
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले
2018 साली शेवटची आपली आतापर्यंतची जी निवडणूक प्रक्रिया झाली होती ती इकडेच (वरळी डोम) झाली होती. म्हणजे खोटं बोलावं ते किती बोलावं..
2013 बघितलं तुम्ही कोण-कोण होतं ते. रामराम गंगाराम पण होते ना त्यात.. पण ही अशी सगळी नालायक माणसं एकत्र करून तुम्ही आम्हाला गिळायला निघालात? आज कदाचित वाटेल गिळलंय.. उद्याची हालत काय होईल तुम्ही बघा..
आता काही जणं मला विचारतात की, उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर.. मी देऊन टाकला राजीनामा कारण मला सत्तेचा मोह नाही.. मी एका क्षणात वर्षा सोडलं आणि मुख्यमंत्री पद सोडलं. भिरकावून दिलं. मी कायदा वैगरे बघत नाही बसलो.. मला वाटलं माझा शिवसैनिक जो शिवसेनाप्रमुखांनी जी शिकवण दिली आहे.. त्या विचाराला, संस्कृतीला मी जागलो आणि जागणार..
काही जण म्हणतात, तुम्ही राजीनामा दिला नसता तर सुप्रीम कोर्टाने तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं. अहो बरोबर आहे.. पण त्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे निरिक्षण नोंदवलं ते फार गंभीर आहे. त्यांनी राज्यपाल महोदय म्हणून जो काही दुसरा नोकर इकडे बसवला होता..
त्यांनी मुळात जे अधिवेशन बोलावलं तेच असैंविधानिक होतं. म्हणजे सरकारच असैंविधानिक बसलं आहे तिकडे, माझ्या राजीनाम्याचं काय घेऊन बसला आहात तुम्ही. राज्यपाल कोश्यारी हे संपूर्ण कटात सामील झाले.
ही लढाई आता या देशात सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार आहे का, की त्यांच्या डोक्यावर लवाद बसणार त्याची ही लढाई आहे. आता सुप्रीम कोर्टाचा आदेश मानायचा की, या लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा ही लढाई आता होणार आहे.
निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे.. एखादी व्यक्ती बँकेत गेलं पैसे काढायला पासबुक वैगरे घेऊन.. तर ते म्हणतात की, तुमचं खातंच नाही आमच्याकडे.. अहो पण पासबुक आहे.. चेकबुक आहे..
अरे तुम्ही काय आमची घटनाच गिळून बसलात.. म्हणजे हा केवढा मोठा कट आहे.. कटाची सुरुवात जी आहे, मूळ आहे.. मला वाटतं 2022 साली जेपी नड्डा आले होते. ते असं म्हणाले होते की, या देशात एकच पक्ष राहणार तो म्हणजे भाजप.. बाकी सगळे जाणार.. ही कटकारास्थानाची सुरुवात आहे. त्यात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स.. निवडणूक आयोग, लवाद हे सगळे गारदी त्यांनी एकत्र केले आणि घाव घालायला सुरुवात केली. शिवसेना संपवायचा प्रयत्न करतायेत. अशी जोरदार टीका उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे.
हे ही वाचा>> Shiv Sena UBT: ‘राहुल नार्वेकरांची बायकोही ‘तो’ निर्णय…’, संजय राऊतांची तोफ धडाडली
आपल्या या भाषणाआधी शिवसेना (UBT)पक्षाने जे व्हीडिओ दाखवले आहेत त्यामुळे आता काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्याची उत्तंर राहुल नार्वेकरांसोबतच एकनाथ शिंदे आणि भाजपला देखील द्यावे लागतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT