Mumbai Tak Chavadi: उद्धव ठाकरे म्हणाले, ‘माझी एकच खुर्ची आहे आता ती सुद्धा जाईल..’ : निलम गोऱ्हे

साहिल जोशी

ADVERTISEMENT

shivsena leader neelam gorhe told an anecdote on mumbai tak chavadi about what exactly happened with Uddhav Thackeray before she joining shinde group
shivsena leader neelam gorhe told an anecdote on mumbai tak chavadi about what exactly happened with Uddhav Thackeray before she joining shinde group
social share
google news

Neelam Gorhe and Uddhav Thackeray: मुंबई: शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी शिंदे गटात जाण्याआधी शिवसेना (UBT) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) नेमकं काय घडलं होतं याचा खास किस्साच मुंबई Tak च्या चावडीवर (Mumbai Tak Chavadi) सांगितला. यावेळी नीलम गोऱ्हे या काहीशा हळव्या झाल्याचंही दिसून आलं. (shivsena leader neelam gorhe told an anecdote on mumbai tak chavadi about what exactly happened with Uddhav Thackeray before she joining shinde group)

काही दिवसांपूर्वी त्यांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं तेव्हा ते म्हणाले की, ‘मला असं वाटतं की, माझी एकच खुर्ची आहे आता विधिमंडळात.. ती तुमच्या दालनात आहे. ती सुद्धा आता जाईल असं वाटतंय म्हणून.. असं ते मला बोलले ते..’ असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या..

नेमका काय आहे किस्सा?

‘उद्धव ठाकरेंवर मला टीका करायला आवडत नाही अजिबात.. पण आता असं होतं की, त्या विषयावर बोलल्याशिवाय माझी मुलाखतच पूर्ण होत नाही. माझं आणि त्यांचं भांडण असं काही झालं नाही. मी शेवटी समान नागरी कायद्यावर जेव्हा त्यांना पत्र दिलं आयोगाला की, समान नागरी कायदा कसा आवश्यक आहे. तेव्हा ते मला म्हणाले की, नीलमताई ते सगळं मला असं वाटतं की, मी वाचतो आणि बघतो. मी म्हटलं की, आपण समान नागरी कायद्याला पाठिंबा दिला पाहिजे. योग्य वेळेवर.. तेव्हा ते म्हणाले की, मी बघतो आणि कळवतो.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> NCP: अजित पवार गटानं ‘या’ चार आमदारांची नाव का वगळली?

‘मग मी नुकतीच बातमी वाचली की, मुस्लिम संघटनांचे लोक त्याच दिवशी त्यांना शिवसेना भवनला भेटून गेले होते. त्यामुळे मविआत गेल्याने त्यांची समान नागरी कायद्यावर थोडीशी मुस्कटदाबी झालेली आहे असं मला वाटतं. त्यांच्या मनात ते.. शेवटी पाठिंबाच त्यांना द्यावा लागेल.. ते विरोधात जाऊच शकत नाही समान नागरी कायद्याच्या संदर्भात..’

‘मग त्यांनी मला एकदा मेसेज केला तर.. ते मला म्हणाले फोनवर की, मला असं वाटतं की, माझी एकच खुर्ची आहे आता विधिमंडळात.. ती तुमच्या दालनात आहे. ती सुद्धा आता जाईल असं वाटतंय म्हणून.. असं ते मला बोलले ते..’

ADVERTISEMENT

‘तर त्यांना मी म्हणाले की, साहेब असं काही होणार नाही. तुमच्यासाठी खुर्ची कायम राहणार माझ्या दालनात.. पण नंतर ते आले तेव्हा माझ्या दालनात आले नाही. ते अंबादास दानवेंकडे गेले.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Parliament Special Session: ‘ऐ @#%$…’ भाजप खासदाराची लोकसभेत दुसऱ्या खासदाराला शिवीगाळ

‘त्यामुळे वादविवाद झाला नाही.. पण त्यांना माझी अस्वस्थतता काही तरी जाणवत असावी. असं मला वाटतं.’ असा किस्साच नीलम गोऱ्हेंनी यावेळी सांगितला.

40 आमदार, 12-13 खासदार सोडून गेले, विचार करणार आहात की नाही?

दरम्यान, यावेळी नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंना काही खडे बोलही सुनावले. जर पक्षातील 40 आमदार आणि 12-13 खासदार का सोडून जातात? याचा विचार कधी करणार आहात की नाही? असा सवालही नीलम गोऱ्हेंनी यावेळी विचारला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT